22 January 2025 3:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
x

Investment Tips | आयुष्यभराची आर्थिक चिंता मिटवणारी गुंतवणूक योजना, आयुष्यभर 50,000 रुपये पेन्शन मिळेल, योजनेची संपूर्ण माहिती

Investment Tips

Investment Tips | जर तुम्ही निवृत्ती नंतर तुमचे आयुष्य आर्थिकरित्या सुरक्षित करण्यासाठी पैसे गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुमच्या साठी LIC ने एक जबरदस्त गुंतवणूक योजना सुरू केली आहे. या योजनेत पैसे गुंतवून तुम्ही आयुष्यभर पेन्शनचा लाभ घेऊ शकता. या योजनेत तुम्हाला फक्त एकरकमी गुंतवणुक करायची आहे, आणि त्याचा फायदा तुम्हाला आयुष्यभर होईल. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्ही आयुष्यभरासाठी 50,000 रुपये पेन्शनचा लाभ घेऊ शकता. वेळोवेळी, LIC आपल्या ग्राहकांच्या गरजेनुसार नवनवीन गुंतवणूक योजना बाजारात लाँच करत असते. जर तुम्हीही गुंतवणूक करून आपले आयुष्य आर्थिक रित्या सुरक्षित बनवू इच्छित असाल तर LIC च्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करा. आज आम्ही या लेखात तुम्हाला LIC च्या एका जबरदस्त स्कीमबद्दल माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही दरमहा पेन्शनचा लाभ घेऊ शकता. या पॉलिसीचे नाव आहे, “LIC सरल पेन्शन योजना”. या योजनेत तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षीपासून पेन्शन लाभ सुरू होईल.

एकरकमी प्रीमियम भरावा लागेल :
LIC ची ही गुंतवणूक योजना एक प्रकारची सिंगल प्रीमियम पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला एकरकमी प्रीमियम जमा भरावा लागेल.एकरकमी गुंतवणूक केल्यास तुम्ही योजनेचा लाभ आयुष्यभर मिळवू शकता. जर योजना चालू असताना पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर, गुंतवणूकीची पूर्ण रक्कम नॉमिनीला व्याजासकट परत केली जाते. LIC सरल पेन्शन योजना ही तात्काळ अॅन्युइटी योजना आहे, याचा अर्थ तुम्ही पॉलिसी घेताच तुम्हाला पेन्शन सुरू केली जाईल. पॉलिसी मध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जेवढी पेन्शन सुरू होईल, तीच पेन्शन आयुष्यभर मिळत राहील.

पॉलिसी घेण्याची प्रक्रिया :

सिंगल लाईफ :
LIC सरल पेन्शन योजनामध्ये तुम्ही पॉलिसी कोणाच्याही नावावर सुरू करू शकता. जोपर्यंत पेन्शनधारक जिवंत आहे तोपर्यंत त्याला दर महिन्याला पेन्शन दिली जाईल. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर बेस प्रीमियमची रक्कम त्याच्या नॉमिनीला परत दिली जाते.

संयुक्त जीवन :
या पॉलिसी प्रकारात पती-पत्नी दोघांचाही जीवन विमा उतरवला जातो. जोपर्यंत प्राथमिक निवृत्तीवेतनधारक जिवंत आहे, तोपर्यंत दोघांना निवृत्ती वेतन दिली जाते. प्राथमिक निवृत्तीवेतनधारकच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन दिली जाते. आणि पत्नीच्या मृत्यूनंतर मूळ प्रीमियमची रक्कम तिच्या नॉमिनीला परत केली जाईल.

योजनेचे वैशिष्ट्य :
*LIC च्या सरल पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वयोमर्यादा 40 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 80 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
* ही आजीवन पॉलिसी योजना आहे, त्यामुळे गुंतवणूकदाराला या योजनेत आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळतो.
* सरल पेन्शन पॉलिसी सुरू केल्याचे तारखेपासून सहा महिन्यांनंतर तुम्ही हवी तेव्हा सरेंडर करू शकता.
* या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्ही दरमहा पेन्शन मिळवू शकता, तसेच पेन्शन त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर पण घेता येते.

दरमहा 50,000 रुपये पेन्शन कशी मिळवाल ?
तुम्हाला दर महिन्याला नियमित पेन्शन लाभ हवा असेल तर तुम्हाला एकरकमी गुंतवणुक करावी लागेल. या योजनेत मासिक किमान 1000 रुपये पेन्शनचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला वार्षिक 12000 रुपये पेन्शन मिळेल. कमाल पेन्शन ची कोणतीही मर्यादा नाही, पेन्शन तुम्हाला तुमच्या गुंतवलेल्या रकमेवर दिली जाईल. समजा तुमचे वय 40 वर्ष आहे, आणि तुम्ही 10 लाख रुपयांची एकरकमी गुंतवणुक केली असेल तर तुम्हाला वार्षिक 50250 रुपये पेन्शन मिळेल. ही पेन्शन रक्कम तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील. याशिवाय, जर तुम्हाला तुमची गुंतवणूक गरजेच्या वेळी बंद करून पैसे हवे असतील तर, तुमच्या गुंतवणुकीतून 5 टक्के रक्कम कपात करून तुम्हाला उर्वरित रक्कम परत केली जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment Tips on LIC Saral Pension scheme for regular monthly pension for lifetime on 08 October 2022.

हॅशटॅग्स

#Investment Tips(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x