Investment Tips | तुमच्या मुलांचे आर्थिक भविष्य तुम्हाला सुरक्षित करायचे असेल तर ह्या योजनेत सुरू करा गुंतवणूक

Investment Tips | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF खात्याची परिपक्वता मुदत 15 वर्ष असते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही योजना केंद्र सरकार मार्फत राबवली जाते. त्यामुळे त्यात गुंतवलेले तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि त्यावर सरकार परतावाही देते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये लहान बचत गुंतवल्यास त्यावर चांगला परतावा मिळू शकतो.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड सविस्तर :
मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी सर्व पालक सतत गुंतवणूक किंवा आर्थिक नियोजन करत असतात. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी खाजगी आणि सरकारी अशा अनेक गुंतवणूक व बचत योजना आहेत. यापैकी एक म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी. PPF ही भारतातील सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित बचत योजनांपैकी एक आहे. PPF चा कार्यकाळ 15 वर्षांचा असतो. आणि हा कार्यकाळ पाच वर्षांसाठी पुढे वाढवता येऊ शकतो.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही केंद्र सरकारची योजना आहे, त्यामुळे त्यात गुंतवलेले पैसे पूर्णपणे सुरक्षित असतात, कारण सरकार ह्या गुंतवणुकीची हमी देते आणि त्यावर परतावाही हमखास असतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये लहान बचत गुंतवल्यास त्यावर चांगला परतावा मिळू शकतो. ही योजना सेवानिवृत्तीसाठी देखील वापरली जाऊ शकते. तुम्ही तुमच्या मुलासाठी PPF खाते देखील उघडू शकता आणि त्याच्या भविष्यातील आर्थिक खर्चासाठी पैसे गुंतवू शकता. लहान वयात पीपीएफ खाते उघडल्यावर ते, पीपीएफ खाते मूल मोठे होईपर्यंत किंवा परिपक्वतेच्या जवळ असे पर्यंत चालू ठेवणे आवश्यक आहे.
मुलांसाठी पीपीएफ खात्याचे फायदे :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्याची परिपक्वता कालावधी 15 वर्ष आहे. जर पैसे 15 वर्षांसाठी जमा केले तर जो काही परतावा व्याज असतो तो तुमच्या गुंतवलेल्या मूळ रकमेत चक्रवाढ पद्धतीने जमा होते आणि नंतर त्यावरही व्याज मिळते. अशा प्रकारे खात्यात चांगली रक्कम जमा होते. जर तुम्ही तुमचे मूल पाच वर्षाचे असताना पीपीएफ खाते उघडले, तर तो 20 वर्षांचा झाल्यावर त्याच्या उच्च शिक्षणासाठी तुम्हाला एक चांगली रक्कम परतावा म्हणून मिळेल. पीपीएफ खाते दर 5 वर्षांसाठी पुढे वाढवता येते.
व्याज दर परतावा :
पीपीएफचा व्याजदर सरकार दर तिमाहीत ठरवते. सध्या पीपीएफचा व्याजदर 7.1 टक्के आहे. सरकार दर तिमाहीत व्याजदर जाहीर करते. दर महिन्याच्या 5 तारखेनंतर महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वात कमी शिल्लक रकमेवर व्याजाची रक्कम मोजली जाते. म्हणून, PPF गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा सल्ला दिला जातो.
किमान गुंतवणूक 500 रुपयांपासून :
PPF खात्यात जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर किमान 500 रुपयांपासून तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता. एका वर्षात तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये पीपीएफ जमा करता येतील. या खात्यात पैसे बचत ही होत राहते आणि, सोबतच करमाफीचा लाभही मिळतो.
PPF खात्यावर सूट EEE श्रेणी अंतर्गत देण्यात येते. याचा अर्थ पीपीएफमध्ये ज्या वर्षी गुंतवणूक केली जाते, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत त्या वर्षी कर सवलत मिळते. गुंतवणुकीच्या रकमेसोबत पीपीएफवर मिळणाऱ्या व्याज परताव्यावर कोणताही कर आकारला जात नाही. पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुमची कर्ज देखील घेऊ शकता. तुम्हाला पीपीएफ खाते उघडण्याच्या तारखेपासून तीन वर्षानंतर ते सहाव्या वर्षाच्या अखेरीपर्यंतच कर्ज घेता येते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Investment tips on public provident fund for huge returns on investment on 30 July 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअर्स BUY, SELL की HOLD करावा? तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: RVNL