17 April 2025 4:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर PSU स्टॉक मालामाल करणार, जबरदस्त तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vedanta Share Price | 27 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, BUY रेटिंग, यापूर्वी 11,485% परतावा दिला - NSE: VEDL Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉकबाबत तज्ज्ञांचे महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअर्समध्ये हलकी तेजी, लॉन्ग टर्ममध्ये 400% रिटर्न दिला, अपडेट जाणून घ्या - NSE: GTLINFRA Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY, SELL की Hold करावा? - NSE: SUZLON Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER
x

Investment Tips | साधारणपणे पैसा वाढवण्यासाठी या 5 गुंतवणूक योजनांकडे कल असतो, या योजना देतात मजबूत परतावा, यादी सेव्ह करा

Investment tips

Investment Tips | सध्याच्या काळात महागाईने आपले हात पाय पसरायला सुरुवात केली आहे. लोकांचे उत्पन्न कमी होत चालले आहे. आणि बेरोजगारी वाढत चालली आहे. अश्या परिस्थितीत आपण आपल्या सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी गुंतवणूक किंवा छोटी बचत केली पाहिजे. जर तुम्हालाही गुंतवणूक करून कमी वेळेत भरघोस परतावा कमवायचा असेल तर, या लेखात आम्ही तुम्हाला गुंतवणुकीच्या काही जबरदस्त पर्यायांबद्दल माहिती देणार आहोत. ह्या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही भरघोस रिटर्न्ससह कर सवलतही मिळवू शकता.

SBI म्युच्युअल फंड :
SBI द्वारे 100 पेक्षा अधिक म्युच्युअल फंड योजना राबवल्या जातात.SBI ही भारतातील सर्वात मोठी बँक तर आहेच, सोबत ती सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी देखील आहे. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तुम्ही केवळ शेअर बाजारातच नाही तर कर्ज रोखे, सोने आणि कमोडिटीमध्येही गुंतवणूक करू शकता. म्युचुअल फंड गुंतवणूक ही बाजाराच्या अधीन आहे. शेअर बाजारातील चढ उताराचा म्युचुअल फंड मधील परताव्यावर देखील परिमाण होतो. जर तुम्हाला पाच वर्षे किंवा त्याहून अधिक 10 वर्षे कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी बाजारात अनेक म्युच्युअल फंड उपलब्ध आहेत. जर तुम्हाला कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही डेट फंड किंवा लिक्विड फंड मध्ये पैसे लावू शकता. जर तुम्हाला दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून भरघोस परतावा कमवू शकता.

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन :
एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन यालाच आपण EPFO म्हणूनही ओळखतो. EPFO हा देखील गुंतवणुकीचा एक शाश्वत आणि हमखास परतावा देणार पर्याय आहे. जर तुम्ही एखाद्या कंपनीचे कर्मचारी असाल तर तुम्ही तुमच्या पगाराचा काही वाटा ईपीएफओमध्ये गुंतवू शकता. जेवढी रक्कम तुम्ही EPFO मध्ये जमा कराल, तेवढीच रक्कम कंपनीकडूनही जमा केली जाईल. ईपीएफओमध्ये गुंतवलेल्या रकमेवर वार्षिक व्याज परतावा मिळतो.

सोन्यातील गुंतवणूक :
गुंतवणुकीसाठी सोने हा एक देखील सुरक्षित आणि अतिशय विश्वासार्ह पर्याय पर्याय मानला जातो. सोने खरेदी करणे तर भारतीयांचा आवडता छंद आहे. सोन्यात गुंतवणुकीसाठी तुम्हाला बरेच पर्याय उपलब्ध आहेत, जसे पेपर गोल्ड, गोल्ड ईटीएफ, सार्वभौम गोल्ड बॉण्ड्स, गोल्ड म्युच्युअल फंड आणि डिजिटल गोल्ड असे अनेक गोल्ड मधील गुंतवणूक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.तुम्ही या सर्व माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करू शकता.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना :
POMIS योजना ही इंडिया पोस्ट मार्फत राबवली जाणार एक अल्पबचत योजना आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर तुम्हाला चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याज परतावा दिला जातो. सुरक्षित गुंतवणुकीसह ही योजना आपल्या गुंतवणूकदारांना हमखास परताव्याची शाश्वती देते. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दर महा व्याज दिला जाईल. या योजनेत तुम्ही किमान 500 रुपये पासून गुंतवणूक करू शकता. आणि कमाल गुंतवणूक रक्कम मर्यादा 4.5 लाख रुपये आहे. जर तुम्ही संयुक्त खाते उघडले तर तुम्ही किमान 1500 रुपये आणि कमाल 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. दोन किंवा अधिक व्यक्ती आपले संयुक्त खाते उघडू शकतात आणि जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकतात.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेला आपण पीपीएफ म्हणूनही ओळखतो. PPF ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. PPF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही जवळच्या बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पीपीएफ खाते उघडून दर महिन्याला त्यात एक ठराविक रक्कम जमा करू शकता. या योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्ष आहे. या खात्यात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment tips to grow money faster with good return check details 21 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Investment Tips(145)MIS scheme(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या