IPO GMP | आला रे आला IPO आला! अल्पावधीत मालामाल करतील, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल
IPO GMP | 2024 या वर्षात अनेक कंपन्यांचे IPO बाजारात दाखल होत आहेत. चालू आठवड्यात जवळपास 9 कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी ओपन केले जाणार आहेत. यापैकी इण्डीजेन कंपनीचा IPO सोमवारपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. यासह रिफ्रॅक्टरी शेप्स, विनसोल इंजिनिअर्स, फायनलाइजिंग टेक्नॉलॉजीज, टीबीओ टेक, सिल्कफ्लेक्स पॉलिमर, आधार हाउसिंग फायनान्स, टीजीआयएफ ॲग्रीबिझनेस आणि एनर्जी मिशन मशिनरी या कंपन्यांचे IPO टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीसाठी खुले केले जातील.
इंडीजेन IPO :
बेंगळुरूस्थित या कंपनीचा IPO 6 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 1,842 कोटी रुपये आहे. या कंपनीने आपल्या IPO स्टॉकची किंमत बँड 430-452 रुपये निश्चित केली आहे. एका लॉटमध्ये कंपनीने 33 शेअर्स ठेवले आहेत. या IPO मध्ये 760 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स जारी केले जाणार आहेत. 2.34 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकले जाणार आहेत.
Finelistings Technologies IPO :
या कंपनीचा IPO 7 मे ते 9 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या IPO चा आकार 13.53 कोटी रुपये आहे. यात 11 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स जारी केले जातील. कंपनीने IPO शेअरची प्राइस बँड 123 रुपये निश्चित केली आहे.
आधार हाउसिंग फायनान्स IPO :
या कंपनीचा IPO 8 मे ते 10 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 3,000 कोटी रुपये आहे. या IPO मध्ये 1,000 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स जारी केले जातील. आणि ब्लॅकस्टोन ग्रुपचा भाग असलेल्या BCP Topco VII Pte Ltd द्वारे 2,000 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले जातील. BCP Topco कडे आधार हाउसिंग फायनान्स कंपनीचे 98.72 टक्के भाग भांडवल आहेत.
टीबीओ टेक आयपीओ :
या कंपनीचा IPO 8 मे ते 10 मे दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. आयपीओ स्टॉकचे वाटप 13 मे रोजी आणि स्टॉक लिस्टिंग 15 मे रोजी केली जाईल. गुंतवणूकीसाठी अँकर बुक 7 मे रोजी ओपन केली जाईल. या कंपनीच्या IPO मध्ये 400 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर्स इश्यू केले जातील. आणि प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांद्वारे 1.25 कोटी शेअर ऑफर फॉर सेल अंतर्गत विकले जातील.
Refractory Shapes IPO :
या कंपनीचा IPO सोमवारपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. हा IPO 9 मे रोजी बंद होईल. हा SME IPO स्टॉक NSE SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केला जाणार आहे. या IPO च्या माध्यमातुन कंपनी 18.6 कोटी रुपये भांडवल उभारणीचा प्रयत्न करणार आहे.
Winsol Engineers IPO :
या कंपनीचा IPO 6 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. हा IPO 9 मे पर्यंत ओपन असेल. या IPO चा आकार 23.36 कोटी रुपये आहे. ही कंपनी आपल्या IPO अंतर्गत 31.15 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. कंपनीने IPO शेअर्सची प्राइस बँड 71 ते 75 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीचे शेअर्स 14 मे रोजी NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील.
सिल्कफ्लेक्स पॉलिमर IPO :
या कंपनीचा IPO 7 मे 2024 ते 10 मे 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. या कंपनीच्या IPO चा आकार 18.11 कोटी रुपये आहे. या IPO मध्ये कंपनी 34.82 लाख फ्रेश शेअर्स जारी करणार आहे. सिल्कफ्लेक्स पॉलिमर कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत 52 रुपये निश्चित केली आहे. या IPO साठी Shreni Shares Ltd कंपनीला बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर रजिस्ट्रार म्हणून BigShare Services Private Limited कंपनीला नियुक्त करण्यात आली आहे.
एनर्जी मिशन मशिनरी IPO :
एनर्जी मिशन मशिनरी कंपनीचा IPO 9 मे 2024 ते 13 मे 2024 रोजी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. या कंपनीच्या IPO चा आकार 41.15 कोटी रुपये आहे. या SME IPO मध्ये कंपनी 29.82 लाख फ्रेश शेअर्स जारी करणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IPO GMP for investment 07 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Mutual Fund SIP | पगारदारांना SIP गुंतवणूक बनवेल 2.2 कोटींची मालक, 4000 रुपयांची गुंतवणूक ठरेल फायद्याची, पहा कॅल्क्युलेशन
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा