3 February 2025 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'ट्रेड वॉर'ने चिंता वाढली, मेटल क्षेत्रातील शेअर्स घसरले - NSE: VEDL SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' 4 योजना देत आहेत मजबूत परतावा, गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या योजना Income Tax e Filing | 12.5 लाख, 15 लाख आणि 20 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या पगारदारांनाही होणार फायदा, पहा किती JP Power Share Price | 14 रुपयांचा शेअर श्रीमंत करतोय, 2400 टक्के परतावा दिला, खरेदी करणार का - NSE: JPPOWER IPO GMP | झटपट कमाईची मोठी संधी चालून येतेय, 5 IPO लाँच होणार या आठवड्यात, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या Senior Citizen TDS Limit | ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 1 लाख रुपयांचा फायदा, पैसे कसे वाचणार समजून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले महत्वाचे संकेत - NSE: IDEA
x

IPO GMP | झटपट कमाईची मोठी संधी चालून येतेय, 5 IPO लाँच होणार या आठवड्यात, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या

IPO GMP

IPO GMP | आयपीओच्या बाबतीत हा आठवडा बराच व्यस्त असणार आहे. आज, 3 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बिझनेस वीकमध्ये 5 कंपन्या आपले आयपीओ सब्सक्रिप्शन उघडत आहेत. यापूर्वी जानेवारी महिन्यात २७ कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून ७३५४ कोटी रुपये उभे केले होते.

1- Chamunda Electricals IPO
कंपनीच्या आयपीओची किंमत ४७ ते ५० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. चामुंडा इलेक्ट्रिकल्सचा आयपीओ 4 फेब्रुवारी ला म्हणजेच मंगळवारला खुला होणार आहे. गुंतवणूकदारांना आयपीओवर बोली लावण्यासाठी ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. कंपनीच्या आयपीओचा आकार १४.६० कोटी रुपये ठेवण्यात आला आहे.

2- केन एंटरप्रायझेसचा आयपीओ
केन एंटरप्रायझेस लिमिटेड या कापड उत्पादक कंपनीचा आयपीओ 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान खुला असेल. आयपीओसाठी केन एंटरप्रायझेस कंपनीने ९४ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. आयपीओचा आकार 83.65 कोटी रुपये आहे.

3- Amwill Healthcare IPO
या आयपीओची किंमत १०५ ते १११ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओमध्ये 44.03 लाख नवीन शेअर्स जारी केले जातील आणि ऑफर फॉर सेल अंतर्गत 10 दशलक्ष शेअर्स जारी केले जातील. हा आयपीओ ५ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत खुला राहणार आहे.

4- Readymix Construction Machinery IPO
आयपीओचा आकार ३७६.६ कोटी रुपये आहे. कंपनीने आयपीओची किंमत १२१ ते १२३ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. कंपनीचा आयपीओ ६ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.

5- Eleganz Interiors IPO
हा आयपीओ ७ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान खुला राहणार आहे. कंपनीच्या आयपीओसाठी प्राइस बँड १२३ ते १३० रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून ७८०.७ कोटी रुपये उभारणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP Monday 03 February 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(181)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x