25 October 2024 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GG Engineering Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 90 पैसे, स्टॉक खरेदीला गर्दी, कंपनी नफा 1422% वाढला - Penny Stocks Jio Finance Share Price | संधी सोडू नका, जिओ फायनान्शियल शेअर देणार मोठा परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO Horoscope Today | व्यवसायात बरकतीचा योग तसेच, 'या' राशींच्या पुरूषांना होईल धनलाभ, वाचा तुमचे आजचे राशीभविष्य Suraj Chauhan | मोहब्बते लुटाऊंगा, बीबी हाऊसमधून बाहेर आल्यानंतर गुलीगतची पहिली रील वायरल, ती सुद्धा लाडक्या मित्राच्या गाण्यावर Dimple Kapadia | अभिनेत्री डिंपल कपाडियाने स्वतःच्याच लेकीचा केला अपमान, म्हणाली, 'मी कोणत्याही ज्युनिअरसोबत पोज देत नाही' Sangram And Khushboo | संग्रामने हटके अंदाजात मारला होता लग्नाचा प्रपोज, म्हणाला 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का तुला'
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, कमाईची संधी सोडू नका - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | शापूरजी पालोनजी समूहाची एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओ शुक्रवार २५ ऑक्टोबरपासून सबस्क्राईब करण्यासाठी खुला होत आहे. हा आयपीओ २९ ऑक्टोबरपर्यंत सबस्क्राईब करण्यासाठी खुला असेल.

या आयपीओ मध्ये रिटेल गुंतवणूकदारांना कमीत कमी १ लॉट आणि जास्तीत जास्त १३ लॉटसाठी सबस्क्राईब करता येणार आहे. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओच्या एका लॉटमध्ये ३२ शेअर्स मिळतील. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये किमान १४८१६ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

IPO ग्रे मार्केट प्रीमियम
एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरची प्राईस बँड ४६३ रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्रे मार्केटमध्ये एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर 65 रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. सध्याच्या जीएमपी’नुसार एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा शेअर ५२८ रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतो.

म्हणजेच स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध होण्याच्या दिवशी जवळपास 15% परतावा मिळू शकतो. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE या दोन्ही प्लॅटफॉर्मवर सूचिबद्ध केले जातील.

शेअर्सची लिस्टिंग ४ नोव्हेंबरला
एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी शेअर्स ४ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा एकूण पब्लिक इश्यू आकार ५४३० कोटी रुपयांचा आहे. शापूरजी पालोनजी अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, गोस्वामी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि फ्लोरिएट इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.

एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीची स्थापना १९५९ साली झाली होती. सप्टेंबर 2023 पर्यंत एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने 15 देशांमध्ये 76 प्रकल्प पूर्ण केले आहेत. तसेच सप्टेंबर 2023 पर्यंत या कंपनीचे 12 देशांमध्ये 67 सक्रिय प्रकल्प आहेत. आयपीओ मार्फत मिळणारी रक्कम भांडवली खर्च, दीर्घकालीन कार्यशील भांडवलाच्या गरजा, सामान्य कॉर्पोरेट खर्च आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरली जाईल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Afcons Infrastructure Ltd 25 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(108)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x