2 March 2025 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Insurance Mistakes | पगारदारांनो, विमा खरेदी करताना या चुका करु नका, अन्यथा तुमच्या अडचणी वाढल्याच समजा Eknath Shinde | शिंदेंचं अजब 'राजकीय आध्यात्मिक' ज्ञान? चक्क दुसऱ्याचं पाप धुण्यासाठी स्वतः महा-कुंभमेळ्यात डुबकी मारली Horoscope Today | 02 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी रविवारचा दिवस, तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअरमध्ये अजून मोठी घसरण होण्याची शक्यता, आकडेवारी आली - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 02 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Business Idea | भविष्यातील उद्योग ऑनलाईनच असतील, हा व्यवसाय सुरु करा, मेहनतीसोबत पैसाच-पैसा मिळेल Gratuity on Salary | 90% पगारदारांना माहित नाही, ग्रॅच्युइटी CTC मध्ये समाविष्ट असते, तुमच्या सॅलरी स्ट्रक्चरवर होतो परिणाम
x

IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा, अशी संधी सोडू नका

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच Awfis स्पेस सोल्युशन्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या को-वर्किंग स्पेस सोल्यूशन्स सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचा IPO 22 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. ( Awfis स्पेस सोल्युशन्स कंपनी अंश )

Awfis स्पेस सोल्युशन्स ही कंपनी आपल्या IPO इश्यूद्वारे प्राथमिक बाजारातून 599 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. आपल्या IPO अंतर्गत ही कंपनी 128 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करणार आहे. आणि 470.93 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत जारी केले जातील.

Awfis Space Solutions या कंपनीची स्थापना 2014 साली झाली होती. ही कंपनी मुख्यतः केटरिंग, आयटी सहाय्य, पायाभूत सुविधा समर्थन आणि इव्हेंट ऑर्गनायझेशन यासारख्या सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहे.

Awfis स्पेस सोल्युशन्स कंपनी आपल्या IPO अंतर्गत एकूण 1.56 कोटी शेअर्स विकणार आहे. यात 33.42 लाख फ्रेश शेअर्स असतील. आणि 1.22 कोटी शेअर्स OFS अंतर्गत प्रवर्तक विकणार आहेत. या कंपनीने आपल्या IPO इश्यूसाठी प्रति शेअर 364-383 रुपये प्राइस बँड निश्चित केली आहे.

किरकोळ गुंतवणूकदार एका लॉटमध्ये किमान 39 इक्विटी शेअर्स खरेदी करू शकतात. एक लॉट खरेदी करण्यासाठी किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 14,937 रुपये जमा करावे लागतील. या कंपनीने आपल्या IPO मध्ये, पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी 75 टक्के कोटा राखीव ठेवला आहे. तर 15 टक्के कोटा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये 10 टक्के कोटा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे.

Awfis स्पेस सोल्युशन्स ही कंपनी आपल्या IPO मधून जमा होणारा निधी नवीन केंद्रे स्थापन करण्यासाठी आणि आपल्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी खर्च करणार आहे. या कंपनीचे IPO शेअर्स 28 मे रोजी वाटप केले जातील. आणि 30 मे रोजी हा स्टॉक NSE आणि BSE इंडेक्सवर सूचीबद्ध केला जाईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of Awfis Space Solutions Ltd 21 May 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(191)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x