6 January 2025 2:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी महत्वाची अपडेट, जुन्या कंपनीमधील EPF चे पैसे असे मिळवा, फायद्याची बातमी IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, GMP सुसाट तेजीत, संधी सोडू नका - GMP IPO OPPO Reno 13 5G | ओप्पो स्मार्टफोनची नवीन सिरीज लाँच होतेय, ओप्पो Reno 13 5G फीचर्स, स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Multibagger Stocks | कुबेर कृपा होईल, पैशाचा पाऊस पाडणारे 5 शेअर्स, 1 महिन्यात 188 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय SBI Interest Rates | SBI बँकेच्या FD व्याजदरात बदल, आता किती व्याजदर मिळणार जाणून घ्या, फायद्यात राहा IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर 60 रुपयांच्या खाली घसरला, स्टॉक BUY करावा की SELL, तज्ज्ञांचा सल्ला - NSE: IRB
x

IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, शेअर प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा - IPO Watch

IPO GMP

IPO GMP | कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट लिमिटेड कंपनी आयपीओ 7 जानेवारी रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट लिमिटेड कंपनी आयपीओ 9 जानेवारीपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट लिमिटेड कंपनी या आयपीओमार्फत 1,578 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे.

आयपीओ शेअर शेअर प्राईस बँड

कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट लिमिटेड कंपनीकडून आयपीओ शेअरसाठी 99 ते 100 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये 75 टक्के हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. तसेच बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 25 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट आयपीओ शेअर्स अलॉटमेंट 14 जानेवारीला अंतिम होईल. त्यानंतर कंपनी शेअर 17 जानेवारीला स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध करण्यात येईल.

कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट कंपनीबद्दल

कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट लिमिटेड कंपनीची स्थापना गवार कन्स्ट्रक्शन कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट म्हणून केली होती. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कॅपिटल इन्फ्रा ट्रस्टने ऑपरेशन्समार्फत 1,485 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. जो मागील आर्थिक वर्षी 2,033 कोटी रुपये होता. तसेच आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा नफा 125.8 कोटी रुपयांपर्यंत घसरला आहे, जो मागील आर्थिक वर्षात 497.2 कोटी रुपये होता.

आयपीओ निधीचा वापर कुठे करणार

कॅपिटल इन्फ्रा ट्रस्ट कंपनी आयपीओ’मार्फत उभारलेल्या निधीचा वापर कर्जाची परतफेड करण्यासाठी करणार आहे. या आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर एसबीआय कॅपिटल मार्केट्स आणि एचडीएफसी बँक यांची निवड करण्यात आली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Capital Infra Trust Ltd Saturday 04 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(166)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x