16 December 2024 3:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN Infosys Share Price | आयटी इन्फोसिस शेअर चार्टवर रॉकेट तेजीचे संकेत, मजबूत कमाई होणार - NSE: INFY BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Insurance Tips | कार इन्शुरन्स क्लेम करण्याच्या नादात 'या' गंभीर चुका करू नका, इथे जाणून घ्या योग्य माहिती SIP Mutual Fund | 5 हजाराची SIP तुम्हाला किती वर्षांत करोडपती बनवेल, एसआयपीचे सविस्तर कॅल्क्युलेशन जाणून घ्या Jio Finance Share Price | बंपर रॅलीचे संकेत, जिओ फायनान्शियल स्टॉक ब्रेकआऊट देणार, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड कंपनी आयपीओ लवकरच गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड कंपनी आयपीओसाठी 269 ते 283 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स आयपीओसाठी 19 डिसेंबर २०२४ पासून गुंतवणूक करता येईल. डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स आयपीओ 23 डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल.

शेअर्स 27 डिसेंबरला सूचिबद्ध होण्याची शक्यता

डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये 2.97 कोटी इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) असेल. म्हणजेच या आयपीओमार्फत नवीन शेअर्स जारी केले जाणार नाहीत. डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 27 डिसेंबर रोजी BSE, NSE वर सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे.

ऑफर फॉर सेलमध्ये कोणते प्रवर्तक शेअर्स विकणार?

डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड OFS मध्ये धर्मेश अनिल मेहता आणि 4 गुंतवणूकदार मल्टीपल्स अल्टरनेट ॲसेट मॅनेजमेंट, नरोत्तम सत्यनारायण सेखसारिया, RBL बँक, EasyAccess Financial Services हे कंपनी प्रवर्तक शेअर्स विक्रीसाठी ठेवतील. धर्मेश अनिल मेहता, त्यांची पत्नी आणि त्यांच्या फर्म बूमबकेट ॲडव्हायझर्सकडे प्रवर्तक म्हणून डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड कंपनीमध्ये एकूण 45.88% हिस्सा आहे. डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड कंपनीमधील उर्वरित 54.12% शेअर्स मल्टिपल्स अल्टरनेट ॲसेट मॅनेजमेंट, नरोत्तम सत्यनारायण सेखसारिया, आरबीएल बँक, EasyAccess Financial Services यांच्याकडे आहेत.

आयपीओचे व्यवस्थापक

नुवामा वेल्थ मॅनेजमेंट कंपनी डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड कंपनी आयपीओसाठी एकमेव बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. तसेच या आयपीओसाठी लिंक इनटाइम इंडिया रजिस्ट्रार आहे. डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड कंपनीच्या मुख्य स्पर्धकांमध्ये आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस आणि जेएम फायनान्शियल यांसारख्या कंपन्यांची नावे आहेत.

कंपनीची आर्थिक स्थिती

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 8 पटीने वाढून 70.5 कोटी रुपये तर महसूल 112 टक्क्यांनी वाढून 180 कोटी रुपयांवर पोहोचला होता. तसेच चालू आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या सहामाहीत एप्रिल-सप्टेंबर, डीएएम कॅपिटल ॲडव्हायझर्स कंपनीने 107.8 कोटी रुपयांचा महसूल आणि 43.8 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of DAM Capital Advisors Ltd Monday 16 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x