23 February 2025 8:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एनफ्यूज सोल्यूशन्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीचा IPO 15 मार्च ते 19 मार्च दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. ही कंपनी आपल्या IPO द्वारे शेअर बाजारातून 22.2 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. या कंपनीचे शेअर्स NSE SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील. ( एनफ्यूज सोल्यूशन्स कंपनी अंश )

एनफ्यूज सोल्यूशन्स ही कंपनी मुख्यतः डेटा व्यवस्थापन आणि विश्लेषण, ई-कॉमर्स आणि डिजिटल सेवा, मशीन लर्निंग आणि एआय आणि एडटेक आणि तंत्रज्ञान समाधानांसह विविध डोमेनमध्ये व्यवसाय करते. आयटी आणि BPM क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये सकारात्मक योगदान देत आहेत.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये भारताच्या GDP मध्ये IT उद्योगाचा वाटा 7.4 टक्के होता. तर 2025 पर्यंत भारताच्या GDP मध्ये आयटी क्षेत्राचा वाटा 10 टक्के पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एनफ्यूज सोल्यूशन्स कंपनी आपल्या IPO मध्ये 23.37 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स इश्यू करणार आहे. याद्वारे कंपनी 22.2 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे.

एनफ्यूज सोल्यूशन्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 91-96 रुपये निश्चित केली आहे. गुंतवणूकदार 1 लॉट अंतर्गत 1,200 शेअर्स खरेदी करू शकतात. डिसेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत या कंपनीने 38 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर 3.22 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. IPO मधुन जमा होणारी रक्कम कंपनी कर्जाची परतफेड, खेळत्या भांडवलाची आवश्यकता भागवण्यासाठी आणि कॉर्पोरेट उद्देशांची पूर्तता करण्यासाठी खर्च करणार आहे.

एनफ्यूज सोल्यूशन्स कंपनीने आपल्या IPO साठी हेम सिक्युरिटीज कंपनीला लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. आणि बिगशेअर सर्व्हिसेस कंपनीला IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त केले आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये 50 टक्के कोटा QIB गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. तर 35 टक्के कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे.

उर्वरित 15 टक्के कोटा NII साठी राखीव ठेवण्यात आला आहे. 20 मार्च रोजी गुंतवणुकदारांना IPO शेअर्सचे वाटप केले जाईल. या कंपनीचे शेअर्स 22 मार्च रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जातील. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 60 रुपये प्रिमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of Enfuse Solutions IPO 16 March 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(191)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x