IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी कमाईची मोठी संधी, प्राईस बँड सह डीटेल्स जाणून घ्या
IPO GMP | जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ २४ जानेवारीपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स लिमिटेड कंपनी या आयपीओमार्फत २५.०७ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. या आयपीओमार्फत कंपनी २४.५८ लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे.
जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स कंपनी आयपीओ प्राइस बँड
जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स लिमिटेड कंपनीने या आयपीओसाठी 95 ते 102 रुपये प्राइस बँड निश्चित केली आहे. रिटेल गुंतवणूकदारांना या आयपीओच्या एका लॉटमध्ये 1200 शेअर्स मिळतील. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांना किमान १,२२,४०० रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे. जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स कंपनी आयपीओमध्ये 50% हिस्सा सार्वजनिक ऑफर पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी, 35 टक्के हिस्सा रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि उर्वरित 15% बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.
जीबी लॉजिस्टिक्स कंपनीबद्दल
जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स लिमिटेड कंपनी लॉजिस्टिक्स क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी आहे. जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स कंपनी उच्च क्षमतेच्या वाहतुकीसाठी फ्लेक्झिबल नेटवर्क सेवा प्रदान करते. तसेच जीबी लॉजिस्टिक्स कंपनी मोठ्या आणि मध्यम आकाराच्या ग्राहकांना पूर्ण ट्रकलोड मालवाहतूक सेवा देखील प्रदान करते.
कंपनीची आर्थिक स्थिती
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स कंपनीचे एकूण उत्पन्न ११५.६३ कोटी रुपये होते. तर कंपनीचा करोत्तर नफा ४.८६ कोटी रुपये होता. 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या कालावधीत जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स कंपनीचे एकूण उत्पन्न 50.85 कोटी रुपये होते. तर कंपनीचा करोत्तर नफा 2.53 कोटी रुपये आहे.
जीबी लॉजिस्टिक्स कंपनी आयपीओ जीएमपी
ग्रे-मार्केटसंबंधित तज्ज्ञांनी दिलेल्या अपडेटनुसार, अनलिस्टेड म्हणजे ग्रे-मार्केटमध्ये जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स कंपनी आयपीओ शेअरचा जीएमपी 21 रुपये आहे, जो प्राईस बँड पेक्षा 20.5 टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होण्यापूर्वीच जीएमपी शून्यावरून २१ रुपयांवर पोहोचला आहे.
जीबी लॉजिस्टिक्स आयपीओ संबंधित तारखा
जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स कंपनी आयपीओ २४ जानेवारी ते २८ जानेवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. २९ जानेवारी २०२५ रोजी शेअर्स वाटप निश्चित होण्याची शक्यता आहे. जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स कंपनी शेअर्स ३० जानेवारी रोजी पात्र गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात जमा केले जातील. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी बीएसई एसएमईवर जीबी लॉजिस्टिक्स कॉमर्स कमोदिनी शेअर्स सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IPO GMP of GB Logistics Limited Friday 24 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE