24 December 2024 9:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स BEL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - NSE: BEL Penny Stocks | कर्ज मुक्त कंपन्यांचे 7 पेनी शेअर्स, किंमत 3 ते 5 रुपये, संयम श्रीमंत करू शकतो - Penny Stocks 2024 IPO Watch | स्वस्त IPO आला रे, प्राईस बँड 14 रुपये, संधी सोडू नका, कुबेर कृपा करू शकतो हा IPO - IPO GMP NHPC Share Price | एनएचपीसी कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: NHPC Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 3 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मजबूत परतावा मिळेल - NSE: TATATECH NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन सहित या 4 शेअर्समध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कमाईची मोठी संधी - NSE: NTPCGREEN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 3 शेअर्स फोकसमध्ये, 55 टक्केपर्यंत परतावा मिळेल - NSE: RELIANCE
x

IPO GMP | स्वस्त IPO आला रे! ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला एका नवीन IPO बद्दल माहिती देणार आहोत. जीपीईएस सोलर कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

सोलर पॅनल उत्पादक जीपीईएस सोलर कंपनीच्या IPO चा आकार 30.79 कोटी रुपये आहे. या कंपनीचा IPO पूर्णपणे फ्रेश इश्यूवर आधारित आहे. ही कंपनी आपल्या IPO अंतर्गत 32.76 लाख फ्रेश शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.

जीपीईएस सोलर कंपनीचा IPO 14 जून रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. हा IPO 19 जूनपर्यंत खुला असेल. या कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअर्सची किंमत बँड 90 रुपये ते 94 रुपये निश्चित केली आहे. कंपनीने एका लॉटमध्ये 1200 शेअर्स ठेवले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना एक लॉट खरेदी करण्यासाठी 1,12,800 रुपये जमा करावे लागतील. जीपीईएस सोलर कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना 20 जून रोजी शेअर्सचे वाटप करेल. आणि हा स्टॉक शेअर बाजारात 24 जून रोजी सूचीबद्ध केला जाईल.

ग्रे मार्केटमध्ये जीपीईएस सोलर कंपनीचे शेअर्स 130 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर हा स्टॉक या प्रीमियम किमतीवर टिकला तर शेअर 224 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच हा स्टॉक पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 138 टक्के नफा कमावून देऊ शकतो. 13 जून रोजी या कंपनीचा GMP 125 रुपये होता. आता जीएमपी 130 रुपये किमतीवर पोहचला आहे.

जीपीईएस सोलर कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 8.30 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. 13 जून 2024 रोजी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी दिली होती. या कंपनीने आपल्या IPO मध्ये 35 टक्के वाटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. आणि 50 टक्के वाटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO GMP of GPES Solar Ltd 15 June 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(160)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x