23 February 2025 8:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी 104 टक्के परतावा मिळेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | स्टॉक मार्केट आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील आठवड्यात आणखी एक आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ १० डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे.

ग्रे-मार्केटमध्ये मध्ये तेजी

जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर्स ग्रे-मार्केटमध्ये या १०४ टक्के प्रीमियमवर पोहोचले आहेत. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनीचा आयपीओ शेअर आज ग्रे मार्केटमध्ये ७५ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध असून त्याची प्राइस बँड ७२ रुपये आहे. ही कंपनी गेस्ट’साठी वन्यजीव आणि संवर्धन-केंद्रित लॉज सेवा प्रदान करते.

आयपीओ तपशील

जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर्स बीएसई एसएमई’वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूसह 4,086,400 इक्विटी शेअर्सचा नवीन आयपीओ जारी करण्यात येणार आहे. जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनीने सांगितले की, ३५% हिस्सा रिटेल गुंतवणूकदारांसाठी, ५० टक्के पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि १५ टक्के हिस्सा उच्च नेटवर्थ व्यक्तींसाठी (एचएनआय) राखीव ठेवण्यात आला आहे.

कंपनी पैशाचा वापर कुठे करणार

जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनी या आयपीओ’मार्फत जवळपास 29.42 कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. कंपनी या निधीतील ७ कोटी रुपये संजय डुबरी राष्ट्रीय उद्यानात नवीन प्रकल्प उभारण्यासाठी करणार आहे. तसेच जंगल कॅम्प्स इंडिया कंपनी मध्य प्रदेशातील पेंच राष्ट्रीय उद्यानात असलेल्या पेंच जंगल कॅम्प या रिसॉर्टच्या नूतनीकरणासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच उत्तर प्रदेशातील मथुरा येथे चार तारांकित हॉटेल विकसित करण्यासाठी मधुवन हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीत ११.५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा जंगल कॅम्प्स इंडिया लिमिटेड कंपनीचा मानस आहे. उर्वरित निधी कंपनीच्या सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरला जाणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Jungle Camps India Ltd Friday 06 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(191)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x