
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मधे गुंतवणूक करून बक्कळ कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. क्रोनोक्स लॅब सायन्सेस कंपनीचा IPO 3 जून पासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीच्या आयपीओचा आकार 130.15 कोटी रुपये आहे. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित असेल. या IPO च्या माध्यमातून क्रोनोक्स लॅब सायन्सेस कंपनीने 96 लाख शेअर खुल्या बाजारात विक्रीसाठी ठेवले आहेत. क्रोनोक्स लॅब सायन्सेस कंपनीचा IPO 3 जून ते 5 जून 2024 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. ( क्रोनोक्स लॅब सायन्सेस कंपनी अंश )
क्रोनोक्स लॅब सायन्सेस कंपनी 6 जून रोजी गुंतवणुकदारांना शेअर्सचे वाटप करेल. आणि 10 जून रोजी या कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील. या कंपनीने आपल्या IPO शेअर्सची किंमत बँड 129 ते 136 रुपये निश्चित केली आहे. या कंपनीने एका लॉटमध्ये 110 शेअर्स ठेवले आहेत. रिटेल गुंतवणूकदाराला किमान एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 14,960 रुपये जमा करावे लागतील. क्रोनोक्स लॅब सायन्सेस कंपनीने आपल्या IPO मध्ये 35 टक्के कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवला आहे. आणि पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारासाठी 50 टक्के कोटा राखीव ठेवला आहे.
IPO पूर्वी क्रोनोक्स लॅब सायन्सेस कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 99.98 टक्के भाग भांडवल धारण केले होते. IPO नंतर हे प्रमाण 74.21 टक्क्यांवर येणार आहे. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, क्रोनोक्स लॅब सायन्सेस कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 82 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर हा स्टॉक लिस्टिंग होईपर्यंत याच GMP वर टिकला तर शेअर 218 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना 60 टक्के नफा मिळू शकतो. क्रोनोक्स लॅब सायन्सेस ही कंपनी मुख्यतः रसायने उत्पादनाचा व्यवसाय करते. ही कंपनी उच्च दर्जाची रसायने, आरोग्य उत्पादने, मेटल रिफायनरी, पर्सनल केअर उत्पादने, ॲग्रोकेमिकल फॉर्म्युलेशन, बनवते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























