5 January 2025 2:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई करा, रेकॉर्ड तारीख नोट करा Personal Loan | कर्जदारांसाठी अलर्ट, आता दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड तपासाला जाणार, हा फायदा देखील होईल
x

IPO GMP | स्वस्त IPO आला रे, शेअर प्राईस बँड सहित GMP जाणून घ्या, अशी संधी सोडू नका - IPO Watch

IPO GMP

IPO GMP | आयपीओ मार्फत कमाईची मोठी संधी चालून आली आहे. परमेश्वर मेटल लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. परमेश्वर मेटल लिमिटेड कंपनीचा आयपीओ २ जानेवारी ते ६ जानेवारी २०२५ दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला असेल. परमेश्वर मेटल लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर ग्रे मार्केटमध्ये तेजीत आहे. परमेश्वर मेटल लिमिटेड कंपनी या आयपीओच्या माध्यमातून २४.७४ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे.

प्राईस बँड आणि ग्रे-मार्केटमध्ये तेजी

परमेश्वर मेटल लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरसाठी ६१ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. परमेश्वर मेटल लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर ग्रे-मार्केट प्रीमियम आधीच २० रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच परमेश्वर मेटल लिमिटेड कंपनीचा शेअर ८१ रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतो. म्हणजेच गुंतवणूकदारांना आयपीओ शेअर सूचिबद्ध होईल त्याच दिवशी ३२ टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळू शकतो. परमेश्वर मेटल लिमिटेड कंपनीचा शेअर ९ जानेवारी २०२५ रोजी बीएसई एसएमई एक्स्चेंजवर सूचीबद्ध होणार आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांना 1 लॉटमध्ये 2,000 शेअर्स मिळतील

परमेश्वर मेटल लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये रिटेल गुंतवणूकदार केवळ १ लॉटसाठी बोली लावू शकतील. गुंतवणूकदारांना आयपीओच्या एका लॉटमध्ये २००० शेअर्स मिळतील. म्हणजेच या आयपीओ’साठी रिटेल गुंतवणूकदारांना 1,22,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. परमेश्वर मेटल लिमिटेड कंपनी आयपीओपूर्वी प्रवर्तकांचा एकूण हिस्सा ९६.३३ टक्के होता, जो कमी होऊन ७०.८१ टक्क्यांवर येईल. परमेश्वर मेटल लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर्सचे अलॉटमेंट ७ जानेवारी २०२५ रोजी अंतिम होईल.

कंपनी काय करते

परमेश्वर मेटल लिमिटेड कंपनीची स्थापना ऑगस्ट २०१६ मध्ये झाली होती. परमेश्वर मेटल लिमिटेड कंपनी रिसायकल केलेल्या तांब्याच्या भंगारापासून तांब्याची तार आणि रॉड तयार करण्याचं काम करते. परमेश्वर मेटल लिमिटेड कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट गुजरातमधील देहगाम येथे आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Parmeshwar Metal Ltd Thursday 02 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(165)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x