5 January 2025 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज फर्म बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: INFY NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPCGREEN CIBIL Score | पगारदारांनो, या 5 स्टेप्स फॉलो करा, तुमचा सिबिल स्कोर कधीही खराब होणार नाही, जाणून घ्या फायद्याची बातमी Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेतून मिळेल मजबूत परतावा, फक्त व्याजाचे 56,803 रुपये मिळतील, फायदा घ्या Sarkari Yojana | सरकार देईल कर्ज, स्वतःचा स्टार्टअप सुरू करा, 'या' योजना देतात झटपट लोन, जाणून घ्या सविस्तर SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, मजबूत कमाईची संधी, GMP सह प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch

IPO GMP

IPO GMP | क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या आयपीओ मार्फत क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेड कंपनी २९० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. या आयपीओ १ कोटी शेअर्सचा पूर्णपणे नवा इश्यू आहे. अमित धवन, मोहित वोहरा, अमृत सिंग रंधावा, रुपिंदर सिंग, विशेष अबरोल आणि विवेक अबरोल, एक जोत सिंग आणि राजबीर सिंग रंधावा हे क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेड कंपनी कंपनीचे प्रवर्तक आहेत.

आयपीओ प्राइस बँड

क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेड कंपनी आयपीओसाठी २७५ ते २९० रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. क्वाड्रंट फ्युचर टेक कंपनी आयपीओच्या एका लॉट मध्ये 50 शेअर्स मिळतील. म्हणजेच रिटेल गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी किमान १४,५०० रुपये गुंतवावे लागणार आहेत.

आयपीओ सब्सक्रिप्शन तारीख

क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेड कंपनी आयपीओ ७ जानेवारी ते ९ जानेवारी २०२५ दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असेल. या आयपीओ शेअर्सचे अलॉटमेंट १० जानेवारी रोजी अंतिम होणार आहे. तसेच क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेड कंपनी शेअर्स १४ जानेवारीला बीएसई, एनएसईवर सूचिबद्ध करण्यात येणार आहेत.

क्वाड्रंट फ्यूचर टेक कंपनीबद्दल

क्वाड्रंट फ्यूचर टेक लिमिटेड कंपनी भारतीय रेल्वेच्या कवच प्रकल्पासाठी नेक्स्ट जनरेशनची ट्रेन नियंत्रण आणि सिग्नल प्रणाली विकसित करते. या तंत्रज्ञामुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि विश्वासार्हता वाढते. क्वाड्रंट फ्यूचर टेक कंपनीकडे इलेक्ट्रॉन बीम विकिरण केंद्रासह एक विशेष केबल उत्पादन सुविधा देखील आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये क्वाड्रंट फ्यूचर टेक कंपनीचे उत्पन्न १५१.८२ कोटी रुपये आणि करोत्तर नफा १४.७१ कोटी रुपये होता.

कंपनी आयपीओ निधी कुठे खर्च करणार

क्वाड्रंट फ्यूचर टेक कंपनी आयपीओमधून मिळणाऱ्या निधीचा वापर दीर्घकालीन कार्यशील भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टमच्या विकासासाठी भांडवली खर्च आणि क्वाड्रंट फ्यूचर टेक कंपनीने घेतलेल्या वर्किंग कॅपिटल टर्म कर्जाच्या सर्व किंवा काही भागाची प्रीपेमेंट किंवा परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी करणार आहे.

क्वाड्रंट फ्यूचर टेक आयपीओ जीएमपी

अनलिस्टेड मार्केटसंबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनलिस्टेड मार्केटमध्ये क्वाड्रंट फ्यूचर टेक कंपनी आयपीओ जीएमपी’बाबत अद्याप अपडेट येणे बाकी आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Quadrant Future Tek Ltd Friday 03 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(165)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x