15 January 2025 7:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
x

IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका

IPO GMP

IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. रुल्का इलेक्ट्रिकल्स कंपनीचा आयपीओ गुरुवार दिनांक 16 मे 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कंपनीचा IPO 21 मे 2024 पर्यंत खुला असेल. ( रुल्का इलेक्ट्रिकल्स कंपनी अंश )

रुल्का इलेक्ट्रिकल्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर 223 रुपये ते 235 रुपये दरम्यान निश्चित केली आहे. रुल्का इलेक्ट्रिकल्स कंपनीने आपल्या IPO लॉटमध्ये 600 शेअर्स ठेवले आहेत.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, रुल्का इलेक्ट्रिकल्स कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 200 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. शेअरची प्राइस बँड आणि ग्रे मार्केटमधील प्रीमियम किंमत पाहता रुल्का इलेक्ट्रिकल्स कंपनीचा IPO स्टॉक 435 रुपये प्रति शेअर किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांना हा IPO स्टॉक वाटप केला जाईल, त्यांना पहिल्याच दिवशी 85.11 टक्के नफा मिळू शकतो.

रुल्का इलेक्ट्रिकल्स कंपनीने आपल्या IPO मध्ये अँकर गुंतवणूकदारांना 235 रुपये प्रति शेअर किमतीवर 3.19 लाख इक्विटी शेअर्स वाटप करून 7.5 कोटी रुपये निधी जमा केला आहे. या कंपनीच्या अँकर बुक सबस्क्रिप्शनमध्ये BofA Securities Europe SA-ODI, Negen Undiscovered Value Fund, Galaxy Noble Global Opportunities Fund PCC-GNGOF1, बेनानी कॅपिटल बेनानी कॅपिटल स्कीम-1, नॉर्थ स्टार अपॉर्च्युनिटीज फंड, व्हीसीसी बुल व्हॅल्यू इनकॉर्पोरेटेड, व्हीसीसी सब-फंड, सेंट कॅपिटल फंड, एमिनेन्स ग्लोबल फंड, पीसीसी जुबिलिया कॅपिटल पार्टनर्स फंड-1 यासारख्या दिग्गज गुंतवणूकदारांचा समावेश आहे.

रुल्का इलेक्ट्रिकल्स ही मुंबई स्थित कंपनी टर्नकी प्रकल्प कंत्राटदार आहे, जी सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिकल आणि फायर फायटिंग टर्नकी प्रकल्पांसाठी सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रिकल सोल्यूशन्स, इलेक्ट्रिकल पॅनल्स, सोलर ईपीसी कॉन्ट्रॅक्ट्स, टर्नकी इलेक्ट्रिकल स्टोरेज प्रोजेक्ट्स, इलेक्ट्रिकल व्यावसायिक आणि औद्योगिक सेवा, देखभाल सेवा, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्ट आणि औद्योगिक, व्यावसायिक, किरकोळ आणि थिएटर क्षेत्रांना डेटासह विस्तृत सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीची शेअर बाजारातील एकमेव सूचीबद्ध पीअर HEC Infra Projects Ltd कंपनी आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO GMP of Rulka Electricals Ltd 17 May 2024.

हॅशटॅग्स

IPO GMP(172)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x