11 January 2025 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, मजबूत कमाईची संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनीचा आयपीओ 29 नोव्हेंबर 2024 रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. तसेच हा आयपीओ 3 डिसेंबर 2024 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर्सचे अलॉटमेंट 4 डिसेंबरला अंतिम होण्याची अपेक्षा आहे.

आयपीओचा तपशील

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी आयपीओचा आकार 846.25 कोटी रुपये इतका आहे. सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी आयपीओमध्ये एकूण 1.92 कोटी शेअर्सची विक्री समाविष्ट आहे. सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी 420 ते 441 रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओ’साठी अर्ज करण्यासाठी गुंतवणूकदारांना कमीत कमी 34 शेअर्स खरेदी करावे लागतील.

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी रिटेल गुंतवणूकदारांना किमान 14,994 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या आयपीओ’मध्ये मोठ्या एनआयआय गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक 67 लॉट (2,278 शेअर्स) आहे आणि त्यासाठी 10,04,598 रुपये गुंतवावे लागणार आहेत. तसेच लहान एनआयआय गुंतवणूकदारांसाठी किमान गुंतवणूक 14 लॉट (476 शेअर्स) आहे आणि त्यासाठी 2,09,916 रुपये गुंतवावे लागणार आहेत.

शेअर बाजारात लिस्टिंग

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर शुक्रवार 6 डिसेंबरला BSE आणि NSE वर सूचीबद्ध होतील. सध्या ग्रे मार्केटमध्ये सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी आयपीओला संथ प्रतिसाद असून ग्रे मार्केट प्रीमियम शुन्य आहे. म्हणजेच आयपीओ फ्लॅट किंमतीत सूचिबद्ध होण्याचा अंदाज आहे.

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी आयपीओ पूर्णपणे ‘ऑफर फॉर सेल’ आहे. याचा अर्थ सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी आयपीओमधून मिळणारे सर्व पैसे शेअर्स विक्री करणाऱ्या भागधारकांकडे जातील. सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनीला आयपीओमधून कोणताही निधी मिळणार नाही.

कंपनीची आर्थिक कामगिरी

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2024 मध्ये सकारात्मक कामगिरी नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या तुलनेत सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनीच्या एकूण महसुलात 14.75 टक्क्यांनी तर निव्वळ नफ्यात 281.32 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

कंपनीचे कामकाज

सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनीची स्थापना 2005 मध्ये झाली. सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनी वैद्यकीय सल्ला, पॅथॉलॉजी आणि रेडिओलॉजिकल चाचणी सेवा प्रदान करते. 30 जून 2024 पर्यंत, सुरक्षा डायग्नोस्टिक लिमिटेड कंपनीकडे 215 ग्राहक टचपॉइंट्स आहेत, ज्यात 49 निदान केंद्रे आणि 166 नमुना संकलन केंद्रे आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Suraksha Diagnostic Ltd 28 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x