18 December 2024 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने धावणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: IRFC Business Idea | केवळ 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीतून 'या' व्यवसायाची सुरुवात करा, लाखोंच्या घरात पैसे कमवाल Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE Quant Mutual Fund | पगारदारांनो, श्रीमंत करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांची यादी सेव्ह करा, पैशाचा पाऊस पडेल Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | या महिन्यात लाँच करण्यात आलेल्या आयपीओ’मधून गुंतवणूकदारांची मोठी कमाई झाली आहे. आता अजून एका कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड कंपनीचा आहे. युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा आयपीओ २३ डिसेंबर पासून गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. युनिमेक एरोस्पेस कंपनीच्या आयपीओ’साठी २६ डिसेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. युनिमेक एरोस्पेस आयपीओ’साठी ७४५ ते ७८५ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे.

आयपीओ 500 कोटींचा

युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आयपीओमध्ये फ्रेश इश्यू आणि ओएफएस या दोन्हीचा समावेश आहे. युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी या आयपीओ’मार्फत ५०० कोटी रुपये उभारणार आहे.

कंपनी आयपीओ निधीचा वापर कशासाठी करणार

युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग आयपीओ’मध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी ५० टक्के, रिटेल गुंतवणूकदारांसाठी ३५% आणि बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५% हिस्सा राखीव ठेवण्यात आले आहे. कंपनी या आयपीओ’मार्फत जमा होणाऱ्या निधीचा वापर कर्ज फेडण्यासाठी करणार आहे. युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी डिफेन्स आणि इतर क्षेत्रांसाठी पार्ट्स बनवते.

कंपनी आयपीओ जीएमपी किती आहे?

इन्व्हेस्टरगेन डॉटकॉमने दिलेल्या अपडेटनुसार, ‘युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग आयपीओचा ग्रे मार्केट प्रीमियम ३५० रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच कंपनीचे शेअर्स ११३५ रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतात. म्हणजे शेअर सूचिबद्ध होण्याच्या दिवशी गुंतवणूकदारांना कमीतकमी 45% परतावा मिळू शकतो.

रिटेल गुंतवणूकदारांना किमान 14,915 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल

युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग आयपीओसाठी शेअर्सचे अलॉटमेंट शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी अंतिम होण्याची शक्यता आहे. मंगळवार, 31 डिसेंबर 2024 रोजी बीएसई आणि एनएसई वर शेअर्स सूचिबद्ध होऊ शकतात. रिटेल गुंतवणूकदार एका लॉटमध्ये 19 शेअर्स मिळतील आणि त्यासाठी किमान 14,915 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Unimech Aerospace Ltd Wednesday 18 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(157)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x