16 October 2024 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात वाढ, 3 महिन्यांची थकबाकीही मिळणार - Marathi News NHPC Share Price | NHPC सहित हे 2 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% परतावा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Property Knowledge | घर खरेदी करताना या गोष्टी तपासता का, पहा RERA कायदा काय म्हणतो, तोटा होण्यापासून स्वतःला वाचवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत अपडेट, शेअर तेजीत येणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: RELIANCE IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ - GMP IPO Smart investment | पगारदारांनो, फक्त पेन्शन भरोसे राहू नका, 555 चा फॉर्मुला वापरा, रिटायरमेंटला 1,05,46,812 रुपये मिळतील IRCTC Share Price | PSU रेल्वे कंपनीचा 21% घसरला, हीच स्वस्तात खरेदीची वेळ, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRCTC
x

IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, ग्रे-मार्केट मध्ये धुमाकूळ - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | कमी वेळेत अधिक कमाईसाठी गुंतवणूकदार IPO चा पर्याय निवडत आहेत. मागील वर्षभरात अनेक IPO ने लिस्टिंगच्या दिवशीच मल्टिबॅगर परतावा दिला आहे. त्यामुळे स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणारे IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी शोधत असतात.

आता IPO गुंतवणूकदारांसाठी अजून एक संधी आली आहे. कारण एनर्जी सेक्टरमधील कंपनीचा आयपीओ गुंतवणूकीसाठी खुला होणार आहे. वारी एनर्जी लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचा आयपीओ सोमवार २१ ऑक्टोबरला सब्स्क्रिबशनसाठी खुला होणार आहे. वारी एनर्जी लिमिटेड कंपनीचा IPO २३ ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. तसेच अँकर गुंतवणूकदारांना शुक्रवार १८ ऑक्टोबरला सबस्क्राईब करता येणार आहे.

आयपीओ बद्दल अधिक माहिती
वारी एनर्जी लिमिटेड आयपीओमध्ये ३६०० कोटी रुपयांचे शेअर्स नव्यानं जारी करण्यात येणार आहेत. वारी एनर्जी लिमिटेड कंपनी प्रवर्तकांव्यतिरिक्त विद्यमान शेअरहोल्डर्सकडून ४.८ मिलियन शेअर्सचा ‘OFS’ यांचा समावेश आहे. OFS द्वारे प्रवर्तक वारी सस्टेनेबल फायनान्स ४.३५ मिलियन तर चांदूरकर इन्व्हेस्टमेंट ४,५०,००० शेअर्सची विक्री करतील. वारी एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओसाठी प्राईज बँड आणि लॉट साइज अजून जाहीर करण्यात आलेले नाहीत.

कंपनी कुठे खर्च करणार
वारी एनर्जी लिमिटेड कंपनीच्या ऑफर फॉर सेलमधून कोणतंही उत्पन्न मिळणार नाही. तसेच नव्या इश्यू मार्फत मिळणारी रक्कम वारी एनर्जी लिमिटेड कंपनीच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीत गुंतवली जाणार आहे.

ओडिशामध्ये ६ गिगावॅट इंगोट वेफर्स, सोलर पीव्ही मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आणि सोलर सेल उभारण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची वारी एनर्जी लिमिटेड कंपनीची योजना आहे. तसेच या निधीचा वापर वारी एनर्जी लिमिटेड कंपनीच्या सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी देखील केला जाणार आहे.

आयपीओची रजिस्ट्रार आणि मॅनेजर्स
वारी एनर्जी लिमिटेड कंपनी आयपीओची लिंक इनटाइम इंडिया रजिस्ट्रार असणार आहे. IIFL सिक्युरिटीज, ऍक्सिस कॅपिटल, जेफरीज इंडिया, नोमुरा फायनान्शिअल ऍडव्हायझरी अँड सिक्युरिटीज, SBI कॅपिटल मार्केट्स, इंटेन्सिव्ह फिस्कल सर्व्हिसेस आणि ITI कॅपिटल पब्लिक याचे बुक-लीड रनिंग मॅनेजर्स म्हणून काम पाहणार आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Waaree Energies Ltd 16 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(101)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x