22 November 2024 12:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, मिळेल 104% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | आयपीओ गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यामुळे पैसे तयार ठेवा असे संकेत ग्रे-मार्केटने दिले आहेत. हा IPO गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा देऊ शकतो. मागील वर्षभरापासून अनेक IPO पहिल्याच दिवशी मोठा परतावा देत आहेत. त्यामुळे स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणारे येणाऱ्या IPO ची आतुरतेने वाट पाहात असतात.

ग्रे-मार्केटमधून सकारात्मक संकेत
वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीचा IPO लवकरच सबस्क्राईब करण्यासाठी खुला होणार आहे. सोलर पॅनेल बनवणाऱ्या वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीचा आयपीओ पुढील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. तसेच ग्रे-मार्केटमधून सुद्धा सकारात्मक संकेत दिसत आहेत. त्यामुळे हा IPO मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब केला जाऊ शकतो असं तज्ज्ञ सांगत आहेत.

लिस्टिंगच्या दिवशी मोठी कमाई
वारी एनर्जीज लिमिटेड कंपनी IPO शेअर ग्रे-मार्केटमध्ये 104% प्रीमियमवर ट्रेड करतोय. सोलर पॅनेल बनवणाऱ्या वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीचा आयपीओ २१ ऑक्टोबरला सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल. तसेच सब्सक्रिप्शनसाठी २३ ऑक्टोबर ही शेवटची तारीख असेल. वारी एनर्जीज लिमिटेड कंपनी IPO साठी अँकर गुंतवणूकदार १८ ऑक्टोबरला बोली लावू शकतील. या आयपीओची किंमत ४,३२१ कोटी रुपये आहे. या आयपीओ साठी १४२७ ते १५०३ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे.

मल्टिबॅगर परतावा मिळेल
वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीचा IPO शेअरला ग्रे-मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. आज वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीचा आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये 1565 रुपयांच्या प्रीमियमवर पोहोचला आहे. म्हणजेच वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीचा शेअर ३०६८ रुपयांवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजे गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी १०४% परतावा मिळू शकतो. वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीचा IPO बीएसई आणि एनएसईवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीचा शेअर २८ ऑक्टोबरला सूचीबद्ध होऊ शकतो.

अधिक तपशील
वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीचा हा IPO प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांच्या प्रत्येकी ३,६०० कोटी रुपयांच्या नवीन शेअर्स आणि ७२१.४४ कोटी रुपयांच्या ४८ लाख शेअर्सची ‘OFS’ यांचे मिश्रण आहे. वारी एनर्जीज लिमिटेड कंपनी IPO ची एकूण इश्यू साइज ४,३२१.४४ कोटी रुपये आहे. वारी एनर्जीज लिमिटेड कंपनीला आयपीओ मार्फत मिळणारी रक्कम ओडिशामध्ये 6 गिगावॅट इंगोट वेफर, सोलर सेल आणि सोलर पीव्ही मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उभारण्यासाठी वापरली जाईल. तसेच एक भाग सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी ठेवला जाईल अशी माहिती कंपनीने दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP of Waaree Energies Ltd 18 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IPO GMP(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x