16 April 2025 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

IPO GMP | पैसे तयार ठेवा, 6 कंपन्यांचे IPO 19 डिसेंबरला उघडणार, प्राईस बँड डिटेल्स नोट करा - GMP IPO

IPO GMP

IPO GMP | प्रायमरी मार्केटमध्ये १९ डिसेंबर २०२४ रोजी ६ कंपन्यांचे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. त्यापैकी मेनबोर्डमध्ये ५ आयपीओ आहेत. आणि एक आयपीओ स्टॉक मार्केट एसएमई सेक्टरचा आहे. जाणून घ्या या आयपीओ बद्दल सविस्तर. मागील वर्षभरात अनेक आयपीओ गुंतणूकदारांना मोठा परतावा देत आहेत.

Transrail Lighting IPO

ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी आयपीओ १९ डिसेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी आयपीओसाठी गुंतवणूकदार २३ डिसेंबरपर्यंत बोली लावू शकतील. ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी या आयपीओ’मार्फत ८३८.९१ कोटी रुपायांचा निधी उभारणार आहे. ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड कंपनी आयपीओ’साठी ४१० ते ४३२ रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित करण्यात आली आहे. रिटेल गुंतवणूकदारांना किमान १४ हजार ६८८ रुपये गुंतवावे लागणार आहेत.

DAM Capital Advisors IPO

डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्स लिमिटेड कंपनी आयपीओ १९ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला असेल. डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्स कंपनीचा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेलवर आधारित आहे. त्यामुळे कंपनीला गुंतवणूकदारांसाठी किमान २.९७ कोटी शेअर्स जारी करावे लागतील. डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्स कंपनी या आयपीओ’मार्फत ८४०.२५ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे.

Mamata Machinery IPO

ममता मशिनरी लिमिटेड कंपनी आयपीओ १९ डिसेंबर २०२४ रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्स कंपनी आयपीओ’साठी २३० ते २४३ रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये ६१ शेअर्स मिळतील. ज्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांना या आयपीओसाठी किमान १४,८२३ रुपये गुंतवावे लागणार आहेत. डीएएम कॅपिटल अ‍ॅडव्हायझर्स कंपनीचा आयपीओ २३ डिसेंबर २०२४ पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. ममता मशिनरी लिमिटेड कंपनी आयपीओचा जीएमपी सध्या १११ रुपये आहे.

Sanathan Textiles IPO

सनाथन टेक्सटाइल्स लिमिटेड कंपनी आयपीओसाठी ३०५ ते ३२१ रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. सनाथन टेक्सटाइल्स कंपनी आयपीओचा लॉट साइज ४६ शेअर्सचा आहे. त्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांना किमान १४, ७६६ रुपयांची बोली लावावी लागणार आहे. सनाथन टेक्सटाइल्स कंपनी आयपीओ’मार्फत ५५० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. हा आयपीओ 19 डिसेंबर ते 23 डिसेंबर या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला असेल.

Concord Enviro IPO

कॉनकॉर्ड एन्व्हायरो लिमिटेड कंपनी आयपीओसाठी ६६५ ते ७०१ रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. कॉनकॉर्ड एन्व्हायरो लिमिटेड कंपनीच्या एका लॉटमध्ये एकूण २१ शेअर्स मिळतील. ज्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांना किमान १४,७२१ रुपये गुंतवावे लागणार आहेत. कॉनकॉर्ड एन्व्हायरो लिमिटेड कंपनी आयपीओ’मार्फत ५००.३३ कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे.

Newmalayalam Steel IPO

न्युमल्यालम स्टील लिमिटेड कंपनी आयपीओचा आकार ४१.७६ कोटी रुपये आहे. न्युमल्यालम स्टील लिमिटेड कंपनी आयपीओ रिटेल गुंतवणूकदारांसाठी १९ डिसेंबर ते २३ डिसेंबर २९२४ या कालावधीत खुला असेल. न्युमल्यालम स्टील लिमिटेड कंपनी आयपीओसाठी ८५ ते ९० रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO GMP Tuesday 17 December 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

IPO GMP(193)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या