22 November 2024 7:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

IPO Investment | नफ्याच्या शेअर्सचे वाटप झाले, स्टेटस तर चेक केलं, पण पुढे काय?, या टिप्स फॉलो करा

IPO investment

IPO Investment| Archean Chemicals कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. Archean Chemicals कंपनीच्या शेअर्सची शेअर वाटप प्रक्रिया 16 नोव्हेंबर 2022 रोजी सुरू झाली आहे. ग्रे मार्केटने या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना चक्रावून टाकले होते. Archean Chemicals कंपनीचा IPO ग्रे मार्केटमध्ये प्रिमियम किमतीवर ट्रेड करत होता. या IPO चा मागोवा घेणाऱ्या तज्ञांच्या मते Archean Chemicals कंपनीचा आयपीओ सुमारे 100 रुपये प्रीमियम किमतीवर व्यापार करत आहे. कालच्या तुलनेत आज ग्रे मार्केट मधील किमतीत 22 रुपयांची वाढ नोंदवली आहे. म्हणजेच मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Archean Chemicals कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 78 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. ग्रे मार्केटमधील वाढ अशीच सुरू राहिली तर या कंपनीचे शेअर्स 507 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना 25 टक्के नफा होईल.

IPO मधील शेअर्सचे वाटप कसे तपासायचे ? :
* तुम्ही बीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला IPO चे शेअर्स भेटले आहे की नाही हे तपासू शक्य. या खालील लिंकवर क्लिक करा आणि IPO शेअर्स चे स्टेटस तपासा.
* bseindia.com/investors/appli_check.aspx किंवा
* लिंक इन टाईम लिंक : linkintime.co.in/MIPO/Ipoallotment.html

BSE वर IPO शेअर्स वाटप तपासण्याची प्रक्रिया :
1- सर्वप्रथम या लिंक वर जाणून लॉग इन करा. bseindia.com/investors/appli_check.aspx
2- Archean Chemicals IPO हा पर्याय निवडा.
3- तुमचा अर्ज क्रमांक टाका.
4- पॅन संबंधित माहिती टाका. आणि शेअरचा स्टेटस तुमच्या समोर असेल.

पैन कार्डद्वारे IPO मधील शेअर्सचे वाटप तपासा :
1- सर्व प्रथम linkintime.co.in/MIPO/poallotment.html ही लिंक ओपन करा.
2- Archean Chemicals IPO हा पर्याय निवडा.
3- पॅन तपशील टाका.
4- सर्च पर्यायावर क्लिक करा.
5- मी रोबोट नाही यावर क्लिक करा.
6- सबमिट करा .
तुमच्या IPO शेअरचा निकाल तुम्हाला दिसेल.

अँकर गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारणी :
Archean Chemicals इंडस्ट्रीजच्या IPO चा आकार 805 कोटी रुपये होता. या फ्रेश IPO इश्यूमध्ये कंपनीच्या प्रवर्तक, आणि गुंतवणूकदारांनी 1.61 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विक्री साठी जारी केले होते. या कंपनीने आपल्या अँकर गुंतवणूकदारांकडून 658 कोटी रुपये भांडवल जमा केले आहे. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना प्रत्येकी 407 रुपयांच्या किमतीवर 1,61,67,991 शेअर्सचे दिले आणि त्यावर 658 कोटी रुपये भांडवल उभारणी केली. गोल्डमन सॅक्स,अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, बीएनपी परिबस, सोसायटी जनरल, गव्हर्नमेंट पेन्शन फंड ग्लोबल, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, डीएसपी स्मॉल कॅप फंड, टाटा म्युच्युअल फंड, एसबीआय एमएफ, निप्पॉन इंडिया एमएफ आणि आदित्य बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स यांसारख्या मोठ्या गुंतवणूक संस्थानी अँकर बुक्सद्वारे या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO investment in Archean Chemicals Share has been issued on 18 November 2022.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x