28 April 2025 12:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
e Filing Income Tax | पगारदारांनो, नवीन टॅक्स प्रणालीमध्ये 75000 रुपयांची स्टॅंडर्ड डिडक्शन मिळणार नाही? मोठी अपडेट LIC Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या सरकारी फंडात, अनेक पटीने पैसा परतावा मिळतोय, सेव्ह करून ठेवा EPFO Passbook | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, EPF प्रक्रियेत मोठे बदल, हक्काच्या पैशाबाबत अपडेट Horoscope Today | 28 एप्रिल 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 28 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594 GTL Share Price | पेनी स्टॉकने लोअर सर्किट हिट केला, हा स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA
x

IPO Investment | एथर इंडस्ट्रीजच्या शेअर्सवर ब्रोकरेजची नवीन टार्गेट प्राईस, या शेअरवर मल्टीबॅगर कमाईची सुवर्ण संधी

IPO investment

IPO Investment | शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की केमिकल्स सेक्टर मध्ये कमालीची तेजी आली असून, पुढील काळात केमिकल्स स्टॉकमध्ये भरघोस वाढ होताना दिसणार आहे. अश्याच एका केमिकल्स स्टॉक बद्दल आपण माहिती घेणार आहोत. शेअर बाजारातील सूचीबद्ध असलेल्या केलिकल्स कंपनीच्या स्टॉकमध्ये हिरवळ पसरलेली दिसत आहे. केमिकल्स सेक्टर मधील स्टॉक मध्ये उलथापालथ असताना एका केमिकल कंपनीचा स्टॉक इतका वाढला आहे की, तो पुढील 3 महिन्यांत 1244 रुपये किमतीपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत, तो आहे एथर इंडस्ट्रीज कंपनीचा.

एथर इंडस्ट्रीज ही केमिकल कंपनी :
BSE आणि NSE वर सूचीबद्ध झाल्यानंतर एथर इंडस्ट्रीज ही केमिकल कंपनी जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे. जेव्हा या कंपनीचा IPO आला होता, तेव्हा कंपनीच्या एका शेअरची इश्यू किंमत 642 रुपये होती. त्याचवेळी IPO खुला झाल्यावर कंपनीचे शेअर्स बीएसईवर 706.15 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. 16 सप्टेंबर रोजी एथर इंडस्ट्रीज च्या शेअर्सने 1048.90 रुपयांची नवीन सर्वकालीन उच्चांक किंमत गाठली. केमिकल कंपनीचे शेअर्स व्यवहाराअंती 1026 रुपयांच्या किमतीवर बंद झाले होते. बाजारातील गुंतवणूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कंपनीचे एथर चे शेअर्स पुढे येणाऱ्या काळात 1200 रुपयांच्याही वर जाऊ शकतात.

मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक :
एथर या केमिकल कंपनीचे शेअर्स बाजारात सकारात्मक कामगिरी करणाऱ्या काही मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. ह्याची किंमत पुढील काळात 1244 रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. स्टॉक मार्केट एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे एथर केमिकलचा स्टॉक सातत्याने तेजीत आहे. पुढील 3 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत चमत्कार होताना दिसेल, आणि किंमत 1244 रुपयांपर्यंत जाऊ शकते. कारण दलाल स्ट्रीटवरील केमिकल स्पेसमध्ये जबरदस्त बढत होताना दिसत आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, केमिकल्सच्या स्टॉकने परतावा चार्टवर नीचांकी पातळी गाठली असून, जे सूचित करते की एथर इंडस्ट्रीजच्या स्टॉकमध्ये थोडीफार चढ-उतार दिसून येऊ शकते. एथर इंडस्ट्रीजच्या शेअर्सवर बाय ऑन डिप्स धोरण अवलंबण्याचा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञांनी दिला आहे. कारण कंपनीच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग होताना दिसू शकते.

जीसीएल सिक्युरिटीजच्या म्हण्यानुसार केमिकल्स सेगमेंटमध्ये पैसे लावण्याची वेळ आली आहे. “केमिकल स्पेस वाढत आहे, कारण या क्षेत्राने सकारात्मक वळण घेतले आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरात पुढील काळात 100 बेसिस पॉईंटची वाढ होण्याची अटकळ असल्याने यावेळी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री दिसून ययेतं आहे. जगभरातील इक्विटी मार्केटमध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे, त्यामुळे गुंतवणूकदार केमिकल स्टॉककडे सुरक्षित म्हणून पाहत आहेत. एथर च्या स्टॉकने चार्ट पॅटर्नवर उच्च-उच्च-निम्न अशी रचना दर्शवली असून, जे सूचित करते की कंपनीला थोडी फार बढत मिळू शकते.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या नोट्स नुसार, आपण एथर च्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करताना 1150-1200 रुपयांचे लक्ष्य ठेवले पाहिजे. आणि जोपर्यंत स्टॉक 950 रुपयांच्या किमतीवर ट्रेड करत आहे तोपर्यंत खरेदी करत राहावी. एथर इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी आपल्या भागधारकांना मागील 5 दिवसांत जवळपास 16 टक्के आणि मागील एका महिन्यात सुमारे 23 टक्केचा मल्टी बॅगर परतावा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO investment of Aether Industries share price return on 17 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या