22 November 2024 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

IPO Investment | IPO शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशीच 90% पेक्षा जास्त परतावा देऊ शकतो, मजबूत पैसा ओतणार हा स्टॉक

IPO Investment

IPO Investment | Arham Technologies Limited LED TV निर्माता कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळत आहे. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 481.79 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर , गैर – संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 418.27 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. अरहम टेक्नॉलॉजीज कंपनीचा IPO आतापर्यंत एकूण 450.03 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीच्या IPO शेअर्सला बंपर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अरहम टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स सध्या ग्रे मार्केटमध्ये आपल्या IPO प्राइस बँडच्या तुलनेत 90 टक्के अधिक प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे.

ग्रे मार्केटमध्ये शेअरची किंमत 42 रुपगे प्रीमियमवर :
अरहम टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये सध्या 40 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. IPO मध्ये या कंपनीच्या शेअर्सची किंमत 42 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. जर शेअर्सची ग्रे मार्केट किंमत प्रीमियम 40 रुपयेवर ट्रेड करत राहिली ते तर या कंपनीचे शेअर्स 82 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकता. म्हणजेच गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगच्या दिवशीच 90 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. अरहम टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 15 डिसेंबर 2022 रोजी NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध होतील.

12 डिसेंबर रोजी शेअर वाटप :
Arham Technologies कंपनी STARSHINE या ब्रँड अंतर्गत विविध आकाराचे LED स्क्रीन टेलिव्हिजन बनवण्याचे काम करते. याव्यतिरिक्त कंपनी तृतीय पक्ष उत्पादकांद्वारे पंखे, एअर कूलर, आणि मिक्सर ग्राइंडर घेऊन आपल्या ब्रँड अंतर्गत त्याची विक्री करते. या कंपनीचा IPO 5 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता आणि तो 7 डिसेंबर 2022 रोजी बंद करण्यात आला. अरहम टेक्नॉलॉजी कंपनीचे IPO शेअर 12 डिसेंबर 2022 रोजी वाटप केले जातील. किरकोळ गुंतवणूकदार अरहम टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO मध्ये फक्त 1 लॉट खरेदी करू शकतात, आणि त्या एक लॉट मध्ये 3000 शेअर्स असतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO Investment of Arham Technologies limited Share is trading on premium price in Gray market on 11 December 2022.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x