19 November 2024 6:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

IPO Investment | IPO बाजारात येण्यापूर्वीच शेअर ग्रे मार्केटमध्ये 33 रुपयांच्या प्रीमियमवर, मजबूत परताव्याचे संकेत, पाहा पूर्ण तपशील

IPO Investment

IPO Investment| सध्या शेअर बाजारात अनेक IPO गुंतवणुकीसाठी खुले केले जात आहेत. तुम्ही जर या वर्षात कोणत्याही IPO मध्ये गुंतवणूक करू शकला नसाल तर 4 ऑक्टोबरला एक IPO तुमच्या साठी गुंतवणुकीची जबरदस्त संधी घेऊन येणार आहे. या IPO चे नाव आहे Electronic Mart India. हा IPO शेअर बाजारात आजच गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. Electronic Mart India.कंपनी ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत आहे. ग्रे मार्केट मध्ये स्टॉक ल कमालीची बोली किंमत मिळत आहे. आणि शेअर अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

ग्रे मार्केटमध्ये स्टॉकची किंमत :
ग्रे मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, आज Electronic Mart India कंपनीचे शेअर्स 33 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच, जर IPO ओपनिंग मध्ये कंपनीचे शेअर्स किंमतीच्या अप्पर बँडवर शेअर्सचे वितरीत झाले तर आजच्या ग्रे मार्केट मधील किमतीनुसार,हा स्टॉक 92 रुपये प्रति शेअर बाजार भावाने सूचीबद्ध होऊ शकतो. गेल्या आठवड्यात गुरुवारी ग्रे मार्केटमध्ये Electronic Mart India कंपनीचे शेअर्स 20 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. हा IPO 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तुम्ही हा IPO मुदत संपण्याच्या आत सबस्क्राइब करू शकता. त्याच वेळी, Electronic Mart India कंपनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केली जाईल.

प्राइस बँड म्हणजे काय?
Electronic Mart India/इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेड कंपनी 500 कोटी रुपये उभारण्यासाठी IPO आणत आहे. कंपनीने शेअर्स ची किंमत बँड 56-59 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. या IPO मध्ये गुंतवणूकदार किमान 254 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. म्हणजेच किमान एक लॉट ची बोली लावण्यासाठी 14,986 रुपये जमा करावे लागतील. गुंतवणुकदार कमाल 13 लॉटसाठी बोली लावू शकतो, आणि त्यासाठी कमाल 194818 रुपये जमा करावे लागतील. IPO मधील 50 टक्के हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. किरकोळ विक्रीसाठी 35 टक्के कोटा राखीव असेल. 15 टक्के कोटा गैर-संस्थागत गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.

IPO चा पैसा कुठे वापरणार?
Electronic Mart India/इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेड कंपनी IPO मधून जो पैसा जमा करेल त्याचा वापर भांडवली खर्चासाठी, खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरेल. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेड/EMIL ची स्थापना पवन कुमार बजाज आणि करण बजाज यांनी ग्राहक टिकाऊ वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर म्हणून केली होती. Electronic Mart India कंपनीवर बजाज इलेक्ट्रॉनिक्सची मालकी आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचे भारतातील 36 शहरांमध्ये एकूण 112 स्टोअर्स आणि आउटलेट सुरू आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO investment of Electronic Mart India share price in Gray Market on premium 04 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x