IPO Investment | हा IPO 437 टक्के सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक करतोय अप्रतिम कामगिरी, मोठा परतावा मिळण्याचे संकेत

IPO Investment | ग्राहकोपयोगी वस्तू आणि रिटेल चेन कंपनी Electronics Mart India कंपनीचा IPO शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. ह्या IPO ला गुंतवणूकदारांकडून आणि गुंतवणूक संस्थाकडून जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. IPO खुला होऊन फक्त तीन दिवस झाले असून शेअर्स 4.37 पट अधिक सबस्क्राईब झाले आहे. Electronics Mart India चा IPO 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला राहील. IPO बद्दल सकारात्मक बातमी अशी आहे की, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा शेअर ग्रे मार्केटमध्ये धिंगाणा करत आहे. या शेअरबद्दल ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त क्रेझ वाढली आहे. Electronics Mart ने 500 कोटी रुपयेचा IPO चा बाजारात आणला आहे. IPO मध्ये शेअरची किंमत 56-59 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. शेअर बाजार तज्ञ आणि गुंतवणुकदार या IPO बाबत उत्साही आहेत.
IPO चे सबस्क्रिप्शन :
IPO बाजारात आपल्यापासून आतापर्यंत 4.37 पट अधिक सबस्क्राईब झाले आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाच्या IPO वर आतापर्यंत 437 टक्के बोली लागली आहे. म्हणजेच IPO आतापर्यंत 4.37 पट अधिक सबस्क्राईब झाला आहे. IPO ची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर असेल. IPO मध्ये 50 टक्के राखीव कोटा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ठेवण्यात आला असून त्यात आतापर्यंत 2.14 पट अधिग्रहण झाले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा राखीव ठवण्यात आला असून आतापर्यंत 5.37 पट अधिक शेअर्स अधिग्रहण झाले आहेत. 15 टक्के राखीव कोटा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असून त्यात आतापर्यंत 5.02 पट अधिक शेअर्स अधिग्रहण झाले आहे.
ग्रे मार्केटमध्ये शेअर 60.टक्केप्रीमियमवर :
इलेक्ट्रॉनिक्स मार्टच्या IPO ची क्रेझ ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त वाढली आहे. या कंपनीचा शेअर सध्या ग्रे मार्केटमध्ये 35 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. शेअरची अप्पर प्राइस बँड 59 रुपयेच्या तुलनेत शेअर ग्रे मार्केटमध्ये 60 टक्के प्रीमियमवर ट्रेड करत आहे. ग्रे मार्केटमध्ये IPO ला जो प्रतिसाद मिळत आहे, त्यावरून या स्टॉकची धमाकेदार ओपनिंग होण्याचे संकेत मिळत आहेत. IPO खुला झाल्यावर ज्या लोकांना IPO मध्ये शेअर्स मिळतील,14 ऑक्टोबर रोजी त्याच्या डीमॅट खात्यात शेअर्स येतील. IPO शेअर बाजारात 17 ऑक्टोबर रोजी सूचीबद्ध केला जाऊ शकतो. आनंदराठी फर्म, IIFL सिक्युरिटीज आणि JM Financial यांना IPO इश्यूचे प्रमुख व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
Electronics Mart IPO:
ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीज फर्मने आपल्या ग्राहकांना या IPO इश्यूमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे की मूल्यांकनाच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स मार्टचा IPO सध्या 0.6x EV/विक्री आणि 22x P/E वर ट्रेड करत आहे. इतर स्पर्धक कंपनीच्या तुलनेत ह्या शेअरची किंमत खूप आकर्षक दिसत आहे. त्यामुळे IPO ची ओपनिंग जबरदस्त होण्याची शक्यता आहे.
ब्रोकरेज हाऊस एंजेल वन आपल्या अहवालात म्हणले आहे की, इलेक्ट्रॉनिक्स मार्टचे IPO येणाऱ्या काळात जबरदस्त परतावा देऊ शकतात, तर शक्य असेल तर सर्वांनी या गुंतवणूक करावी. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की कंपनीच्या महसुलात मागील दोन वर्षांत 17 टक्के CAGR वाढ पाहायला मिळाली आहे. शेअर ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी करत असून, स्टॉक प्रीमियम किमतीवर लिस्ट होईल असे संकेत मिळत आहेत.
ब्रोकरेज KR चोक्सी यांनी इलेक्ट्रॉनिक्स मार्टच्या आयपीओमध्ये बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की या कंपनीमध्ये दीर्घ काळात जबरदस्त वाढ होईल आणि कंपनीची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे. त्यामुळे तज्ञांनी या IPO मध्ये बोली लावण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| IPO Investment of Electronic mart India share price trading on premium price in gray Market on 07 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO