19 November 2024 12:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर फोकसमध्ये, आली मोठी अपडेट, शेअर पुन्हा मजबूत परतावा देणार - NSE: IRFC SBI Mutual Fund | सरकारी SBI फंडाची श्रीमंत बनवणारी योजना, केवळ 2500 रुपयांची बचत देईल 1.18 करोड रुपये - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या
x

IPO Investment | या IPO ने लिस्टिंगच्या एकाच दिवशी पैसा दीडपट केला, गुंतवणूकदारांची दिवाळी गोड, स्टॉक खरेदी करावा?

IPO Investment

IPO investment| इलेक्ट्रॉनिक मार्ट इंडियाच्या IPO ने लिस्टिंग ट्रेडमध्ये गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचा शेअर BSE निर्देशांकावर 50.59 टक्क्यांच्या वाढीसह 89.40 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. याशिवाय हा शेअर NSE निर्देशांकावर 52.54 टक्क्यांच्या वाढीसह 90 रुपयांच्या पातळीवर सूचीबद्ध झाला होता. काल शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली, पण त्यानंतरही बाजार स्थिरावला आणि या IPO ने चांगली वाढ नोंदवली होती. सध्या हा शेअर मजबूत प्रीमियममध्ये ट्रेड करत आहे. कंझ्युमर ड्युरेबल्स रिटेल चेन कंपनी इलेक्ट्रॉनिक मार्ट इंडियाच्या IPO ची जबरदस्त ओपनिंग पाहायला मिळाली. ई-कॉमर्स व्यवसायातून ही कंपनी एकूण उत्पन्नाच्या केवळ 1 टक्के कमवते.

IPO चे तपशील :
7 ऑक्टोबर 2022 रोजी इलेक्ट्रॉनिक मार्ट इंडियाचा IPO 71.93 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. आकडेवारीनुसार, 6.25 कोटी शेअर ऑफर करण्यात आला होते, त्या तुलनेत 449.53 कोटी शेअरची बोली प्राप्त झाली होती. या IPO मध्ये, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला भाग 169.54 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. गैर-संस्थात्मक खरेदीदारांचा राखीव भाग 63.59 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. दुसरीकडे, किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव भाग 19.71 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या IPO मध्ये कंपनीने 500 कोटी रुपयांचा नवीन इश्यू बाजारात आणला होता. त्याच वेळी, कंपनीने IPO मध्ये 56 रुपये ते 59 रुपये प्रति शेअर किंमत बँड निर्धारित केली होती. याशिवाय 254 शेअर्स लॉट साइज निश्चित करण्यात आली होती.

कंपनीबद्दल थोडक्यात :
Electronics Mart India कंपनीची स्थापना 1980 साली हैदराबादमध्ये बजाज इलेक्ट्रॉनिक्सच्या नावाने सुरू झाली होती. नंतर ही कंपनी देशातील चौथ्या क्रमांकाची आणि सर्वात वेगाने वाढणारी ग्राहक उपयोगी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर म्हणून नावारूपाला आली. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियाचा सर्वाधिक व्यवसाय आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात विस्तारला आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया लिमिटेड कंपनीची स्थापना पवन कुमार बजाज आणि करण बजाज यांनी बजाज इलेक्ट्रॉनिक्स या नावाने केली होती, ज्याचे रूपांतर नंतर इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया मध्ये करण्यात आले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO Investment of Electronics Mart India share price opening on Stock market in premium on 18 October 2022.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x