23 February 2025 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office FD Vs RD | पोस्ट ऑफिस FD की RD, 5 लाखांच्या ठेवीवर जास्त फायदा कुठे मिळेल येथे जाणून घ्या Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार
x

IPO Investment | हा IPO बाजारात येताच धमाका करणार, शेअर बाजारात लिस्टिंगपूर्वीच हा शेअर ग्रे मार्केटमध्ये 40 रुपये प्रिमियमवर

IPO investment

IPO Investment | एक अशी कंपनी शेअर बाजारात लवकरच सूचीबद्ध होणार आहे जी बाजारात येण्या आधीच ग्रे मार्केट मध्ये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. बुधवारी ग्रे मार्केटमध्ये सिरमा एसजीएसचा आयपीओ 40 रुपयांच्या प्रीमियमवर पोहोचल्याचे शेअर बाजारातील तज्ञांचे म्हणणे आहे. मंगळवारी या कंपनीच्या IPO प्रीमियम किंमत 25 रुपये होती.

सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा आयपीओ :
80 दिवसांच्या दीर्घ कालावधी शेअर बाजारात एक नवीन IPO येणार आहे. सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा हा आयपीओ लवकरच शेअर बाजारात येणार आहे. कंपनीचा IPO 12 ऑगस्ट 2022 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला होता आणि 18 ऑगस्टपर्यंत गुंतवणूक करण्यासाठी हा स्टॉक खुला राहील. सिरमा SGS IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. किरकोळ आणि लहान गुंतवणूकदारांचा एक वेगळा कोटा असतो तो बुधवारी दुपारपर्यंत 1.79 पट सबस्क्राइब झाला होता. त्याच वेळी, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार कोट्यात 1.05 पट बोली लागली आहे. सिरमा एसजीएसच्या शेअर्सना ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रीमियम मिळताना दिसत आहे. कंपनीचे शेअर्स बुधवारी ग्रे मार्केटमध्ये तब्बल 40 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर पोहोचले आहेत.

प्रीमियम किंमत 25 ते 40 रुपये :
कंपनीच्या शेअर्सची प्रीमियम किंमत 25 ते 40 रुपयांच्या वर गेली आहे. शेअर बाजार तज्ञ आणि गुंतवणूकदार यांचे म्हणणे आहे की बुधवारी ग्रे मार्केटमध्ये सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजीचा आयपीओ तब्बल 40 रुपयांच्या अधिक किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचा IPO मंगळवारपेक्षा 15 रुपये अधिक प्रीमियम किमतीवर पोहोचला आहे. ग्रे मार्केटमध्ये सिरमा एसजीएस कंपनीचे शेअर्स 25 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजार तज्ञांचे म्हणणे आहे की सिरमा एसजीएसच्या ग्रे मार्केट प्रीमियममध्ये वाढ दुय्यम गुंतवणूक बाजारातील सकारात्मक भावनांमुळे वाढताना दिसत आहे. या कंपनीच्या ग्रे मार्केट प्रीमियम किमतीमध्ये जबरदस्त वाढ होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

शेअर आणखी वाढण्यासाठी सज्ज :
बुधवारच्या 40 रुपयांच्या प्रीमियम किमतीवर पोहोचल्यावर हा शेअर आणखी वाढण्यासाठी सज्ज झाला असल्याचे दिसून येत आहे. सूचीकरणासाठी सज्ज असलेला सिरमा SGS चा IPO ची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत 18 टक्के जास्त असून याचा लिस्टिंग फायदा गुंतवणूकदारांना नक्की होणार आहे. कंपनीच्या IPO ची किंमत 209 रुपये ते 220 रुपये च्या दरम्यान आहे. जर या कंपनीचे शेअर्स 220 रुपयांच्या अधिक प्राइस बँडवर वाटप केले गेले आणि ग्रे मार्केटमध्ये 40 रुपये प्रीमियमवर सूचीबद्ध केले गेले, तर समजा कंपनीचे शेअर्स 260 रुपयांना बाजारात सूचीबद्ध होतील. बाजार निरीक्षकांचे आणि तज्ञांचे म्हणणे आहे की ग्रे मार्केटमधील IPO मधून किमतीत 18 टक्के वाढ अपेक्षित आहे. शेअर बाजार तज्ञांचे म्हणणे आहे की ग्रे मार्केट प्रीमियम कोणत्याही शेअर च्या वधारण्याचे किंवा खाली पडण्याचे एक आदर्श सूचक नाही. गुंतवणूकदारांनी IPO टाकण्याच्या आधी या कंपनीचा बॅलन्स शीट आणि मागील कामगिरी तपासली पाहिजे, ज्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीची योग्य माहिती तुम्हाला भेटेल आणि तुम्ही गुंतवणूक करावी की करू नये, हा निर्णय घेणे सोपे जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IPO investment of Syrma SGS IPO share price return in gray Market on 18 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x