26 December 2024 11:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Vs BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्स मालामाल करणार, तेजीचे संकेत, मिळेल 35 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL ITC Share Price | आयटीसी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट नोट करा, यापूर्वी 2715% परतावा दिला - NSE: ITC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअर 5000 रुपयांची पातळी ओलांडणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरवर ब्रोकरेज बुलिश, स्टॉक रेटिंगसह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NBCC Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 75 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: ASHOKLEY Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत फायद्याची अपडेट, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर कमाई होईल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP

IPO Watch

IPO Watch | स्टॉक मार्केट आयपीओ गुंतवणूकदारांसाठी 2024 वर्षी चांगला नफा देणारे ठरले आहे. आता नवीन वर्षात आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची मोठी संधी चालून आली आहे. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनीचा आयपीओ 31 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे.

इंडो फार्म इक्विपमेंट कंपनी आयपीओ प्राईस बँड

इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनी आयपीओसाठी 204 ते 215 रुपये प्रति शेअर प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. इंडो फार्म इक्विपमेंट कंपनी आयपीओसाठी ऍंकर गुंतवणूकदारांना 30 डिसेंबर रोजी बोली लावता येईल.

ग्रे मार्केटमध्ये आयपीओची स्थिती

इन्व्हेस्टरगेन डॉटकॉमच्या मते, अनलिस्टेड मार्केट म्हणजे ग्रे-मार्केटमध्ये इंडो फार्म इक्विपमेंट कंपनी शेअर 50 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. म्हणजेच शेअर बाजारात सूचिबद्ध होण्याच्या दिवशीच हा शेअर गुंतवणूकदारांना कमीतकमी 24 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो. इंडो फार्म इक्विपमेंट कंपनी शेअर 265 रुपयांवर सूचिबद्ध होऊ शकतो.

आयपीओ निधीचा वापर कुठे करणार

इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनी आयपीओ’मध्ये 86 लाख नवीन इक्विटी शेअर्स आणि 35 लाख इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. इंडो फार्म इक्विपमेंट कंपनी आयपीओमार्फत उभारलेल्या निधीचा वापर कंपनीचा विस्तार, कर्जाची परतफेड आणि कंपनीच्या NBFC उपकंपनी बरोटा फायनान्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी करणार आहे.

कंपनी बद्दल

इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनीची स्थापना 1994 मध्ये करण्यात आली होती. चंदीगड स्थित इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनी ट्रॅक्टर, पिक आणि कॅरी क्रेन आणि विविध प्रकारच्या कापणी यंत्रांचे उत्पादन करते. कंपनी इंडो फार्म आणि इंडो पॉवर या दोन ब्रँड नावांनी कार्यरत आहे. इंडो फार्म इक्विपमेंट लिमिटेड कंपनी आपली उत्पादने नेपाळ, सीरिया, सुदान, बांगलादेश आणि म्यानमारसह अनेक देशांमध्ये निर्यात करते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IPO Watch of The Indo Farm Equipment Ltd  Thursday 26 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#IPO Watch(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x