IRB Infra Share Price | भरवशाचा स्वस्त शेअर अजून स्वस्तात खरेदी करा, खरेदीनंतर संयम मोठा परतावा देईल
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आज अक्षरशः तळ गाठला आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत वाढत होते. तर आज या स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. हा लोकसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालांचा परिमाण आहे. सोमवारी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 13 टक्के वाढीसह 74.60 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मंगळवार दिनांक 4 जून 2024 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 16.07 टक्के घसरणीसह 61.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
नुकताच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 3 जून 2024 पासून भारतातील टोल टॅक्समध्ये 3-5 टक्के वाढ केली आहे. यासह आज लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत, त्यामुळे भारतीय शेअर बाजार अक्षरशः क्रॅश झाला आहे. याचा आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सवर देखील पाहायला मिळत आहे. 27 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 76.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 160 रुपये किमतीवर आला आहे.
मागील एका वर्षात आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 155 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 98 टक्के वाढवले आहेत. यावर्षी YTD आधारे आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 75 टक्के मजबूत झाला आहे. मागील पाच वर्षांत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 11 रुपयेवरून वाढून 72.90 रुपयेवर गेला आहे. याकाळात आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 530 टक्के वाढला आहे.
अॅक्सिस सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक पुढील काळात 86 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी मुख्यतः महामार्ग विकास आणि टोल संबंधित व्यवसायात गुंतलेली आहे. त्यामुळे टोल शुल्कातील झालेल्या बदलाचा कंपनीला फायदा होऊ शकतो. ही टोल वाढ घाऊक किंमत निर्देशांक आधारित महागाईतील बदलांशी संबंधित असते. भारतात राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवर अंदाजे 855 टोल प्लाझा असून यावर राष्ट्रीय महामार्ग शुल्क दर आणि संकलनाचे निर्धारण अधिनियम 2008 नुसार वापरकर्ता शुल्क आकारले जाते.
मागील 10 वर्षांत केंद्र सरकारने भारतात राष्ट्रीय महामार्गांचा विस्तार करण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. भारतातील महामार्गांची एकूण लांबी 1,46,000 किलोमीटर आहे. भारतातील महामार्ग नेटवर्क जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते नेटवर्क आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये देशातील एकूण टोल वसुली 25,200 कोटींवरून वाढून 54,000 कोटींवर पोहचली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IRB Infra Share Price NSE Live 04 June 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE