IRB Infra Share Price | मजबूत कमाई होणार! IRB इन्फ्रा शेअरची रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीने नुकताच आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जून तिमाहीत कंपनीने पाच टक्के वाढीसह 140 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. महसुली उत्पन्नात वाढ झाल्यामुळे आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत आयआरबी इन्फ्रा कंपनीने 134 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )
या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 13 टक्क्यांनी वाढून 1,972 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,745 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आज सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 0.74 टक्के वाढीसह 62.43 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
आयआरबी इन्फ्रा डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी एका निवेदनात माहिती दिली की, जून तिमाहीत कंपनीने चांगली सुरुवात केली आहे. या तिमाहीत कंपनीचे टोल संकलन 1556 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 1183 कोटी रुपये टोल महसूल संकलित केला होता. तसेच कंपनीच्या संचालक मंडळाने 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी प्रति इक्विटी शेअर 10 पैसे अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. लाभांश वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून कंपनीने 20 ऑगस्ट 2024 हा दिवस निश्चित केला आहे.
मागील आठवड्यात शुक्रवारी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 2.73 टक्के घसरणीसह 61.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 84 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 66 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
सेंट्रम ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरबी इन्फ्रा स्टॉक पुढील काळात 85 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आयआरबी इन्फ्रा ही कंपनी मुख्यतः महामार्ग विभागात व्यवसाय करणारी भारतातील पहिली इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IRB Infra Share Price NSE Live 12 August 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 737% परतावा दिला - NSE: ADANIPOWER