15 January 2025 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा स्टॉक टेक्निकल चार्टवर ब्रेकआऊटचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. आज या स्टॉकने जबरदस्त कामगिरी करून गुंतवणुकदारांना सुखद धक्काच दिला आहे. मागील एका 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 181 टक्के परतावा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरने गुंतवणूकदारांना आयआरबी इन्फ्रा स्टॉक 84 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( आयआरबी इन्फ्रा कंपनी अंश )

तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 66 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याची शिफारस केली आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर हा स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला 18.18 टक्के परतावा सहज मिळू शकतो. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 42,925.21 कोटी रुपये आहे. आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी आयआरबी इन्फ्रा स्टॉक 1.28 टक्के वाढीसह 67.79 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने 66.50 रुपये ही आपली 50 दिवसांची EMA पातळी ओलांडली आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकचा RSI मजबूत आहे. टेक्निकल चार्टनुसार आयआरबी इन्फ्रा स्टॉक 84 रुपये किमतीवर जाऊ शकतो. जून 2024 तिमाहीत आयआरबी इन्फ्रा कंपनीने वार्षिक टोल महसुलात 35 टक्के वाढ नोंदवली आहे. जून 2024 मध्ये दोन्ही आयआरबी इन्फ्रा कंपनीची टोल वसुली 517 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. तर जून 2023 मध्ये कंपनीची टोल वसुली 383 कोटी रुपये नोंदवली गेली होती.

आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 78.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 24.97 रुपये होती. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 54 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 70 टक्के वाढली आहे. मागील 2 वर्षात आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 240 टक्के वाढवले आहेत. मागील 5 वर्षांत आयआरबी इन्फ्रा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदाराना 719 टक्के नफा कमावून दिला आहे.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड ही कंपनी महामार्ग विभागात व्यवसाय करणारी भारतातील पहिली इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी मानली जाते. आयआरबी इन्फ्रा कंपनीकडे एकात्मिक खाजगी टोल रस्ते आणि महामार्ग पायाभूत सुविधा विकासक म्हणून 70,000 कोटी रुपयेपेक्षा जास्त मालमत्ता आहे. आयआरबी इन्फ्रा कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड संपूर्ण भारतात 17200 लेन किलोमीटरचे बांधकाम, टोलिंग, संचालन आणि देखभाल करण्याचा आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price NSE Live 22 July 2024.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x