22 November 2024 1:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

IRB Infra Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार IRB इन्फ्रा शेअर, ऑर्डर बुक मजबूत, फायद्याची अपडेट नोट करा - Marathi News

Highlights:

  • IRB Infra Share Price – NSE: IRBINFRA
  • YTD आधारे 20 टक्के परतावा दिला
  • 38 टक्के मार्केट काबीज
  • 5 वर्षांत 675 टक्के परतावा दिला
IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | बुधवारी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स 4.13 टक्क्यांच्या घसरणीसह 59.85 रुपये किमतीवर ट्रेड होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत (NSE: IRBINFRA) पातळी 78.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 28.67 रुपये होती. ऑगस्ट 2024 मध्ये या कंपनीने मजबूत आर्थिक कामगिरी केली होती. (आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी अंश)

YTD आधारे 20 टक्के परतावा दिला
YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे शेअर्स 2.53 टक्के वाढीसह 61.57 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ऑगस्ट 2024 मध्ये आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचा टोल महसूल 503 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा टोल महसूल 417 कोटी रुपये नोंदवला होता. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी भारतात विविध 12 राज्यांमध्ये टोल रस्त्यांचे विस्तीर्ण नेटवर्क हाताळते. ही कंपनी 80,000 कोटी रुपये मालमत्तेसह टोल रस्ते बांधणे, चालवणे आणि देखरेख करणे यांसारखे काम करते.

38 टक्के मार्केट काबीज
सध्या आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी 15,500 लेन किलोमीटरचे टोल रस्ते व्यवस्थापित करते. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने टोल ऑपरेट ट्रान्सफर स्पेसमध्ये 38 टक्के मार्केट काबीज केला आहे. भारताच्या उत्तर-दक्षिण हायवे कनेक्टिव्हिटी मार्केटमध्ये आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचा वाटा 12 टक्के आहे. आयआरबी कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये 26 रस्ते प्रकल्प सामील आहेत.

5 वर्षांत 675 टक्के परतावा दिला
यामध्ये 18 बिल्ड-ऑपरेट-हस्तांतरण प्रकल्प, 4 TOT प्रकल्प आणि 4 हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल प्रकल्प आहेत. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे बाजार भांडवल 36,000 कोटी रुपये आहे. जून 2024 पर्यंत LIC कंपनीने आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे 3.33 टक्के भागभांडवल धारण केले होते. 30 जून 2024 पर्यंत या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 33,600 कोटी रुपये आहे. 30 मे 2024 रोजी या कंपनीच्या प्रवर्तकांनी 24,00,00,000 शेअर्स विकून नफा वसुली केली होती. या कंपनीचे मागील पाच वर्षांत 675 टक्के वाढले आहेत.

Latest Marathi News | IRB Infra Share Price 13 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x