19 November 2024 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Money From Shares | दिवाळीत तुम्हाला लॉटरी लागलीच समजा, हा शेअर तब्बल 200 टक्के परतावा देण्याचे संकेत, स्टॉक नेम सेव्ह करा

Stock In Focus

Stock In Focus| वाढत्या महागाईचा आणि जगभरातील आर्थिक मंदीच्या भीतीमुळे भारतीय शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अशा स्थितीत एक प्रश्न नक्की पडतो की या अस्थिर काळात कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी, आणि कोणत्या शेअर पासून लांब राहावे? या शेअर बाजारातील उलथापालथीच्या काळात स्टॉक मार्केट तज्ज्ञाची भूमिका आणि गुंतवणुकीबाबत सल्ला अत्यंत महत्त्वाचा ठरतो. गुड रिटर्नच्या अहवालात, ब्रोकरेज व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पुढे येणाऱ्या काळात “IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स” कंपनीच्या शेअर्समध्ये 200 टक्क्यांहून अधिक वाढ होऊ शकते.

शेअरची कामगिरी :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचा शेअर NSE निर्देशांकावर 2.90 टक्क्यांच्या वाढीसह 243.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ब्रोकरेज फर्मला आशा आहे की, या कंपनीच्या शेअरची किंमत पुढील येणाऱ्या काळात 729 रुपयांपर्यंत जाईल. गुंतवणूक तज्ज्ञ आणि एक्स्पर्टनी या शेअरला ‘बाय’ टॅग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. व्हेंचुरा सिक्युरिटीजच्या अहवालानुसार या कंपनीचे शेअर्स पुढील 30 महिन्यांत जबरदस्त वाढ नोंदवू शकतात.

कंपनीची कामगिरी थोडक्यात :
मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअरच्या किमतीत फक्त 3.05 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. त्याच वेळी, गेल्या तीन वर्षांत कंपनीमध्ये पैसे लावणाऱ्या लोकांनी 261 टक्क्यांचा परतावा कमावला आहे. वर्षभरापूर्वी ज्या लोकांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना सध्या 0.69 टक्के तोटा झाला आहे. 2022 मध्ये IRB कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 9.63 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. NSE निर्देशांकावर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 345.85 रुपये आहे. कंपनीचा मुख्य व्यवसाय महामार्ग बांधकाम आणि देखरेख संबंधित आहे. IRB इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्यालय मुंबई शहरात आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IRB infrastructure limited Stock In Focus of Stock market expert for buying on Dip on 22 October 2022

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x