18 November 2024 3:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट

Ircon Share Price

Ircon Share Price | इरकॉन इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीच्या संयुक्त उपक्रमाला 1,200 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. IRCON इंटरनॅशनल लिमिटेड आणि दिनेशचंद्र आर अग्रवाल इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपन्यांच्या इरकॉन डीआरए या संयुक्त उपक्रमाला शिवलिंगपुरम स्टेशन ते बोरागुहालू स्टेशनपर्यंत कोट्टावलासा-कोरापुट दुहेरीकरण प्रकल्पाचे काम मिळाले आहे. सोमवार दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी इरकॉन इंटरनॅशनल स्टॉक 1.87 टक्के वाढीसह 255.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( इरकॉन इंटरनॅशनल कंपनी अंश )

इरकॉन इंटरनॅशनल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा नवीन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 1260 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. हा नवीन प्रकल्प अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम मोडमध्ये पूर्ण केला जाणार आहे. ईस्ट कोस्ट रेल्वे कंपनीच्या या प्रकल्पाचे मूल्य 1,198.09 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी इरकॉन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 250.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जानेवारी 2023 मध्ये इरकॉन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 69.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधरच्या तज्ञांच्या मते, इरकॉन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स मजबूत वाढू शकतात. तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना 210 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीचे शेअर्स पुढील काही आठवड्यात 280 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

19 एप्रिल रोजी इरकॉन इंटरनॅशनल कंपनीने माहिती दिली की त्यांना 2014-15 या वर्षासाठी RCF रायबरेली प्रकल्पासंदर्भात 42.87 कोटी रुपयांची व्हॅट मागणी प्राप्त झाली आहे. इरकॉन इंटरनॅशनल कंपनी मुख्यतः रेल्वे बांधकाम, रेल्वेचे विद्युतीकरण, सिग्नल आणि दूरसंचार, रस्ते, महामार्ग, व्यावसायिक, औद्योगिक आणि निवासी संकुल, विमानतळ धावपट्टी, लोकोमोटिव्ह भाड्याने देणे या संबंधित व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ircon Share Price NSE Live 29 April 2024.

हॅशटॅग्स

IRCON Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x