20 January 2025 5:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO 8th Pay Commission | सरकारी क्लार्क पासून मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत इतका पगार आणि पेन्शन वाढणार, ग्रेड प्रमाणे रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 94 पैशाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, सतत अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - BOM: 511700 IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ घालतोय शेअर Gold Rate Today | बापरे, लग्नसराईच्या हंगामात सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, BUY करावा की SELL - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

IRCTC Share Price Hits New High | IRCTC'च्या शेअर्समध्ये तेजी, BSE वर 5,593.85 रुपयांवर पोहोचला

IRCTC Share Price Hits New High

मुंबई, १४ ऑक्टोबर | भारतीय आयटी क्षेत्राने दुसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरी केल्याने आयटी समभागांच्या शेअर किमतींमध्ये चांगली वाढ झाल्याने बाजारात चांगला उत्साह पाहायला मिळत आहे. आज बीएसई सेन्सेक्सने (IRCTC Share Price Hits New High) आतापर्यंत 61,159 वर नवीन उच्चांक नोंदविला आहे आणि 352 अंकांनी वाढून 61,089 वर स्थिरावला आहे. एनएसई निफ्टीने 18,295 वर नवीन शिखर गाठले आणि 111 अंकांनी वाढून 18,273 वर पोहोचला आहे.

IRCTC Share Price Hits New High. Shares of IRCTC continued their upward movement in Thursday’s session to scale a new high of Rs 5,593.85 on BSE, following a 13.5 per cent rally in the intra-day trade on the back of heavy volumes :

बीएसई आयटी इंडेक्समध्ये देखील लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे, तो 1.2 टक्क्यांनी वाढून 35,217 वर पोहोचला आहे. यापूर्वी निर्देशांकाने 35,794 चा उच्चांक गाठला होता. बीएसई रियल्टी, मेटल आणि कॅपिटल गुड्स इंडेक्स हे इतर 1.3-2.7 टक्क्यांनी वाढले आहेत.

1,784 रुपयांचा उच्चांक गाठणारा इन्फोसिस 1.4 टक्क्यांनी वाढून 1,733 रुपयांवर पोहोचला आहे. विप्रोने बीएसईवर 723.65 रुपयांचा नवा उच्चांक गाठला आणि 4.8 टक्क्यांनी वाढून 705 रुपयांवर स्थिर झाल्याचं पाहायला मिळतंय. टेक महिंद्रा 1.4 टक्क्यांनी वधारला आहे, तर एचसीएल टेक्नॉलॉजीज घसरला असून त्यात 0.8 टक्क्यांनी घसरून 1,255 रुपयांवर आला आहे.

IRCTC’च्या शेअर्समध्ये तेजी:
दरम्यान, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या शेअर्सने आजच्या सत्रात तेजी कायम ठेवून BSE वर 5,593.85 रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे. आज दुपारी 01:37 वाजता, एसएंडपी बीएसई सेन्सेक्समध्ये 0.50 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत सरकारी मालकीच्या या ट्रॅव्हल सपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा स्टॉक 12 टक्क्यांनी वाढून 5,532 रुपयांवर पोहोचला. एनएसई आणि बीएसईमध्ये आतापर्यंत एकत्रित 11.73 दशलक्ष इक्विटी शेअर्ससह काउंटरवरील ट्रेडिंग व्हॉल्यूम जवळपास 1.5 पटीने वाढले.

ऑगस्टपासून, 30 जुलै 2021 रोजी कंपनीने स्टॉक स्प्लिट प्लॅन जाहीर केल्यानंतर IRCTC ची मार्केट व्हॅल्यू दुप्पट ते 141 टक्क्यांनी वाढली आहे. 12 ऑगस्ट 2021 रोजी आयआरसीटीसीच्या बोर्डाने भांडवली बाजारातील तरलता वाढवण्यासाठी, शेअरहोल्डर बेस वाढवण्यासाठी आणि छोट्या गुंतवणूकदारांना शेअर परवडण्याकरता 1: 5 च्या प्रमाणात स्टॉक स्प्लिट मंजूर केले आणि त्याचा मोठा फायदा होताना दिसत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: IRCTC Share Price Hits New High continued upward movement new high of 5593 rupees on BSE.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x