16 January 2025 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL Wedding Insurance | वेडिंग इन्शुरन्स घेण्याचे जबरदस्त लाभ, आता पॉलिसीमधून उचला लग्नाचा खर्च, जाणून घ्या फायद्याची बातमी . Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल NTPC Share Price | पीएसयू NTPC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार हा शेअर, टार्गेट नोट करा - NSE: NTPC Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअरबाबत UBS ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA EPFO Minimum Pension | खासगी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, EPFO कडून महिना किमान 7500 रुपये पेन्शन मिळणार
x

IREDA Share Price | IREDA शेअर पुन्हा फोकसमध्ये, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, कंपनीबाबत अपडेट नोट करा - Marathi News

Highlights:

  • IREDA Share PriceNSE: IREDA – इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश
  • कर्ज वितरण
  • स्टॉक टेक्निकल चार्ट
  • गुंतवणुकीवर परतावा
IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण (NSE: IREDA) पाहायला मिळत आहे. चालू आर्थिक वर्षात 30 सप्टेंबर 2024 पर्यंत आयआरईडीए कंपनीने मंजूर केलेले कर्जे मागील वर्षीच्या 4437 कोटी रुपयेवरून 303 टक्के वाढून 17860 कोटी रुपये झाले आहे. आयआरईडीए कंपनीने 30 सप्टेंबर पर्यंत मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 56 टक्के अधिक कर्ज वाटप केले आहे. (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी अंश)

कर्ज वितरण
या कंपनीने 9,787 कोटी रुपये कर्ज वितरित आहे, जे मागील वर्षी 6,273 कोटी रुपये होते. 30 सप्टेंबरपर्यंत आयआरईडीए कंपनीची कर्ज थकबाकी 64,500 कोटी रुपये होती. वर्ष-दर-वर्ष आधारे कंपनीच्या कर्ज थकबाकीत 36 टक्के वाढ झाली आहे. या कंपनीचे एकूण कर्ज पुस्तक 47,514 कोटी रुपये होते. मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 1.82 टक्के घसरणीसह 230.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

स्टॉक टेक्निकल चार्ट
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीचे 33.1 लाख शेअर्स ट्रेड झाले होते. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या 50 दिवसांच्या एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ट्रेड करत आहेत. 2024 या वर्षात आयआरईडीए स्टॉक 121 टक्के वाढला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 62 टक्के नफा कमवून दिला आहे.

गुंतवणुकीवर परतावा
मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 18 टक्के वाढली आहे. 29 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 32 रुपये या IPO किमतीपेक्षा 56 टक्के प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाले होते. आयआरईडीए कंपनीला भारत सरकारने QIP अंतर्गत 4,500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये कंपनीमधील भारत सरकारची शेअरहोल्डिंग पोस्ट-इश्यू आधारावर 7 टक्क्यांपर्यंत कमी केली जाईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price 02 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(139)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x