15 January 2025 10:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

IREDA Share Price | IREDA शेअर मालामाल करणार, स्टॉक पुन्हा फोकस मध्ये, फायद्याची अपडेट आली - Marathi News

Highlights:

  • IREDA Share PriceNSE: IREDA – भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजेंसी लिमिटेड अंश
  • जून तिमाहीचे निकाल सकारात्मक असतील?
  • कंपनीच्या शेअर्सची सध्याची स्थिती
  • 1 वर्षात दिला 270% परतावा
IREDA Share Price

IREDA Share Price | भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजेंसी लिमिटेड म्हणजे PSU कंपनी इरेडा शेअर पुन्हा फोकसमध्ये येणार आहे. कारण ही सरकारी कंपनी याच (NSE: IREDA) आठवड्यात तिमाही निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. (भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजेंसी लिमिटेड अंश)

माध्यमांच्या रिपोर्टनुसार, सरकारी IREDA कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल येत्या 10 ऑक्टोबर 2024 ला जाहीर करू शकते. कारण त्याच दिवशी सरकारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक प्रस्तावित असल्याचे वृत्त आहे. या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे या तिमाही निकालावर विशेष लक्ष असणार आहे. सोमवार दिनांक 07 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 2.46 टक्के घसरून 216.21 रुपयांवर ट्रेड करत आहे.

सरकारी इरेडा कंपनीने गेल्या वर्षीच शेअर बाजारात पदार्पण केले होते आणि अल्पावधीतच हा शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला होता. शेअर बाजारातील लिस्टिंगच्या दिवसापासून या शेअरची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. मागील आठवड्याच्या शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.59% टक्क्यांनी घसरून 222 रुपयांवर बंद झाला होता.

जून तिमाहीचे निकाल सकारात्मक असतील?
सरकारी इरेडा कंपनीच्या दृष्टिकोनातून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल सकारात्मक होते. त्यानुसार, सरकारी इरेडा कंपनीच्या निव्वळ नफ्यात एकूण 30 टक्क्यांनी वाढ झाली होती असं आकडेवारी सांगते. पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून या कालावधीत सरकारी इरेडा कंपनीचा एकूण नफा 383 कोटी रुपये होता. विशेष म्हणजे याच कालावधीत सरकारी इरेडा कंपनीचा महसूल 32 टक्क्यांनी वाढून 1501 कोटी रुपयांवर पोहोचला होता. त्यापूर्वी, म्हणजे मागील वर्षी तोच आकडा 1143.50 कोटी रुपये इतका होता हे आकडेवारीत स्पष्ट झालं होतं. त्यामुळे दुसऱ्या तिमाहीचे निकाल देखील सकारात्मक असतील असे संकेत मिळत आहेत.

कंपनीच्या शेअर्सची सध्याची स्थिती
सरकारी इरेडा कंपनीच्या शेअर्स गुंतणूकदारांसाठी मागील एक महिना नकारात्मक राहिला होता. मागील एका महीन्यात हा शेअर 6 टक्क्यांनी घसरला आहे. जुलै महिन्याच्या 15 तारखेपासून या शेअर्समध्ये करेक्शन दिसून येत आहे. मात्र पुढे हा शेअर मालामाल करू शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

1 वर्षात दिला 270% परतावा
2024 या वर्षी या शेअरने गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मागील 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. इरेडा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 310 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 50 रुपये आहे. आजच्या तारखेपर्यंत कंपनीचे मार्केट कॅप 59,577 कोटी रुपये आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price 07 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x