15 January 2025 4:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

IREDA Share Price | 370% मल्टिबॅगर परतावा देणारा IREDA शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | IREDA कंपनी शेअर्समध्ये पुन्हा तेजीचे संकेत दिसत आहेत. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (NSE:IREDA) शेअरने यापूर्वी मल्टिबॅगर परतावा दिला आहे. इरेडा शेअर प्राईस ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून ३७० टक्क्यांनी वाढली आहे. IREDA कंपनीबाबत नवीन अपडेट आल्यानंतर शेअर बाजार तज्ज्ञ या शेअरबाबत उत्साही आहेत. शॉर्ट टर्म मध्ये हा शेअर चांगला परतावा देईल असा विश्वास स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड अंश)

नवीन उपकंपनीला मंजुरी
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने नवीन उपकंपनी स्थापन केली आहे. इरेडा कंपनी त्यासाठी मान्यता देखील दिली आहे. नवीन उपकंपनी अक्षय ऊर्जा क्षेत्र, रिटेल आणि B2B व्यवसायावर केंद्रित काम करेल. नवीन उपकंपनी पीएम सूर्यघर, पीएम कुसुम योजना आणि इतर B2C व्यवसायावर अधिक फोकस करेल अशी माहिती देण्यात आली आहे. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.95 टक्के घसरून 221.86 रुपयांवर पोहोचला होता.

कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने गुरुवारी तिमाही निकाल जाहीर केले. कंपनीने स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, जुलै ते सप्टेंबर दरम्यान कंपनीचा निव्वळ नफा ३८७.७४ कोटी रुपये होता. जो वार्षिक आधारावर ३६ टक्क्याने अधिक आहे. मागील वर्षी याच तिमाहीत इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीला २८४.७३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तर जुलै तिमाहीत IREDA कंपनीचा निव्वळ नफा 383 कोटी रुपये होता.

कंपनीच्या उत्पन्नात वाढ
सप्टेंबर तिमाहीत इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. जून ते सप्टेंबर या तिमाहीत इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे उत्पन्न १६३० कोटी रुपये होते. जे वार्षिक आधारावर ३८.५० टक्क्याने अधिक आहे. मागील वर्षी सप्टेंबर तिमाहीत IREDA कंपनीचे उत्पन्न ११७७ कोटी रुपये होते.

निव्वळ व्याज उत्पन्नात वाढ
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या निव्वळ व्याज उत्पन्नातही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत IREDA कंपनीचा ‘NII’ ३५९.८० कोटी रुपये होता. जो वार्षिक आधारावर ५२ टक्क्याने अधिक आहे. त्यासोबत IREDA कंपनीच्या ‘NPA’ मध्ये कोणताही बदल झालेला नाही. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा ‘NPA’ यावेळी २.१९% टक्के राहिला आहे.

तज्ज्ञांकडून ‘BUY’ रेटिंग
IREDA शेअरबाबत तज्ज्ञ उत्साही आहेत. स्टॉक मार्केट विश्लेषक AR रामचंद्रन यांनी IREDA शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, ‘इरेडा शेअर डेली चार्टवर तेजीत असून २०६ रुपयांवर मजबूत आधार आहे. तज्ज्ञांनी IREDA शेअरसाठी २५९ रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे.

शेअरचा परतावा
इरेडा शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. 2024 या वर्षात IREDA शेअरने 124% परतावा दिला आहे. मागील सहा महिन्यांत शेअरने ४१% परतावा दिला आहे. मात्र,इरेडा शेअर प्राईस ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून ३७० टक्क्यांनी वाढली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price 14 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x