14 January 2025 5:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा SBI Mutual Fund | मुलांच्या नावाने SBI चिल्ड्रन फंडात पैसे गुंतवा, 4 पटीने पैसे वाढतील, मिळेल करोडोत परतावा
x

IREDA Share Price | IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचा शेअर शुक्रवारी 3 टक्क्यांनी वाढला होता. इरेडा कंपनीचे (NSE:IREDA) दुसऱ्या आर्थिक तिमाहीचे निकाल सकारात्मक ठरल्याने शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली होती. इरेडा कंपनीच्या निव्वळ नफ्यात ३६ टक्क्यांनी वाढ होऊन तो ३८७.७५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.95 टक्के घसरून 221.86 रुपयांवर पोहोचला होता. (इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश)

आर्थिक तिमाहीची आकडेवारी
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी ही देशातील सर्वात मोठी ग्रीन फायनान्सिंग NBFC आहे. सप्टेंबर तिमाहीत इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे व्यावसायिक उत्पन्न १६३०.३८ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यात एकूण ३८% वाढ झाली आहे. तसेच कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न ५४६.८ कोटी रुपये झाले आहे. त्यात ऐकून ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत या शेअरने १२५% परतावा दिला आहे. मंगळवार 15 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.86 टक्के वाढून 223.40 रुपयांवर पोहोचला होता.

कंपनीने दिली अपडेट
जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे लोनबुक ६४,५६४ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. त्यात ३५.८८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष प्रदीप कुमार दास म्हणाले, “सप्टेंबर तिमाहीचे निकाल आमच्या अक्षय ऊर्जेच्या उद्दिष्टांना पुढे नेण्यासाठी सकारात्मक संकेत दर्शवितात. कंपनीच्या कर्ज मंजुरी आणि वितरणात लक्षणीय वाढ झाल्याने कंपनीचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा ‘NPA’ २.१९% आणि निव्वळ NPA १.०४% राहिला आहे.

नवीन उपकंपनीला मान्यता
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीने १० ऑक्टोबर रोजी माहिती दिली की, ‘कंपनीच्या रिटेल व्यवसायासाठी पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून यासाठी मान्यता मिळाली आहे. ही उपकंपनी पीएम-कुसुम, रूफटॉप सोलर आणि इलेक्ट्रिक वाहने, ऊर्जा साठवणूक, ऊर्जा कार्यक्षमता आणि हरित तंत्रज्ञान यासारख्या प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करेल.

शेअरने किती परतावा दिला
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील १ वर्षात २९३% परतावा दिला आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत १२५% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price 15 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x