20 January 2025 9:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी इरेडा कंपनी शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली होती. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंटद्वारे निधी उभारण्यासाठी बोर्डाची मंजुरी घेणार आहे. यासाठी इरेडा कंपनीने संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. गुरुवारी २३ जानेवारी रोजी इरेडा कंपनी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती स्टॉक एक्स्चेंजला फाइलिंगमध्ये देण्यात आली आहे.

२०२४ मध्ये इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी संचालक मंडळाने पात्र संस्थांना ४,५०० कोटी रुपयांचे शेअर्स विकण्यास मान्यता दिली होती. सोमवार, 20 जानेवारी 2025 रोजी इरेडा कंपनी शेअर 0.14 टक्क्यांनी वाढून 207.40 रुपयांवर पोहोचला होता.

इरेडा कंपनीचे सीएमडी प्रदीप कुमार दास यांनी सीएनबीसी-टीव्ही 18 वर मुलाखतीत सांगितले की, ;इरेडा कंपनी चालू तिमाहीच्या अखेरीस निधी उभारण्याच्या पर्यायांवर विचार करेल. इरेडा कंपनी लवकरच क्यूआयपी आणणार असल्याने आम्हाला सर्व आघाड्यांवर तयारीत आहे आणि गुंतवणूकदारांचा विश्वास गमावणे कंपनीला परवडणारे नाही, असं त्यांनी म्हटलं.

२०२४ मध्ये इरेडा कंपनीने रिटेल उपकंपनी स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. प्रदीप कुमार दास पुढे म्हणाले की इरेडा कंपनीने भारतीय रिझर्व्ह बँकेकडे व्यवसाय आराखडा सादर केला आहे आणि त्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यापासून इरेडा कंपनी शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र, सध्या इरेडा शेअर ३१० रुपयांच्या उच्चांकी पातळीपेक्षा ३० टक्क्यांनी खाली घसरला आहे. इरेडा आयपीओ शेअरची प्राईस बँड ३२ रुपये प्रति शेअर होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price Monday 20 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(142)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x