17 November 2024 11:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

IREDA Share Price | IREDA स्टॉकची रेटिंग अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक 'BUY' करावा की Sell?

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीचे शेअर्स गुरुवारी 12 टक्के वाढीसह 265.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारी हा स्टॉक (NSE: IREDA) हिरव्या निशाणीवर क्लोज झाला होता. नुकताच या कंपनीने पात्र संस्थात्मक प्लेसमेंट आणि राइट्स इश्यूच्या माध्यमातून 4,500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची योजना आखली आहे. 29 ऑगस्ट 2024 रोजी कंपनीने भांडवल उभारणी करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )

2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 144 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 0.93 टक्के वाढीसह 259.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

आयआरईडीए ही नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील व्यवसाय करणारी मिनीरत्न दर्जा असलेली कंपनी आहे. मागील वर्षी 29 नोव्हेंबर 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 56 टक्के प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाला होता. या कंपनीचा IPO 32 रुपये किमतीवर ओपन झाला होता. या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 710 टक्क्यांनी वाढला आहे. आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 49.99 रुपये या लिस्टिंग किंमतीच्या तुलनेत 420 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

जून तिमाहीत आयआरईडीए कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक 30 टक्के वाढ झाली होती. या कंपनीने जून तिमाहीत 383.69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जून तिमाहीत कंपनीचा ऑपरेशनल महसूल वार्षिक 32 टक्क्यांनी वाढून 1.502 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आयआरईडीए स्टॉकमध्ये सकारात्मक वाढीची शक्यता व्यक्त केली आहे. तज्ञांनी आयआरईडीए स्टॉकला ‘बाय’ रेटिंग देऊन 330 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. फिलिप कॅपिटल फर्मने या स्टॉकवर SELL रेटिंग देऊन टार्गेट प्राइस 130 रुपयेपर्यंत कमी केली आहे.

News Title | IREDA Share Price NSE: IREDA 24 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(115)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x