18 November 2024 1:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

IREDA Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर, संधी सोडू नका, PSU शेअर रेकॉर्ड करणार

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच Indian Renewable Energy Development Agency या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपले जून 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. एप्रिल ते जून 2024 या कालावधीत आयआरईडीए कंपनीने 383.69 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )

मागील आर्थिक वर्षांच्या जून तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 30.25 टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीच्या महसुल संकलनात मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवली आहे. आज सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 5.26 टक्के वाढीसह 299.22 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयआरईडीए कंपनीने जून तिमाहीत 383.69 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 294.58 कोटी रुपये PAT नोंदवला होता. जून तिमाही निकाल जाहीर करणारी आयआरईडीए ही कंपनी बँकिंग आणि NBFC क्षेत्रात व्यवसाय करणारी पहिली कंपनी ठरली आहे. जून 2024 तिमाहीत आयआरईडीए कंपनीचा एनपीए 0.95 टक्के नोंदवला गेला आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत कंपनीचा NPA 1.61 टक्के नोंदवला गेला होता. 30 जून 2024 रोजी आयआरईडीए कंपनीची एकूण संपत्ती 9110.19 कोटी रुपये होती. तर 30 जून 2023 रोजी कंपनीची नेट वर्थ 6290.40 कोटी रुपये होती. याचा अर्थ वार्षिक आधारावर कंपनीच्या नेट वर्थमध्ये 44.83 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.

जून 2024 तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 1501.71 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1143.50 कोटी रुपये महसूल संकलित होता. आयआरईडीए कंपनीने जून 2021 तिमाहीत 9210.22 कोटी रुपये कर्ज मंजूर केले आहे. मागील वर्षी या कंपनीने फक्त 1892.45 कोटी रुपये कर्ज मंजूर केले होते. मागील आठवड्यात शुक्रवारी आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सनी विक्रमी उच्चांक स्पर्श केला होता. तर आज देखील हा स्टॉक तुफान तेजीत वाढत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 304.60 रुपये या इंट्रा-डे उच्चांक किमतीवर पोहचले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 15 July 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(115)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x