18 November 2024 5:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

IREDA Share Price | IREDA स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारी 5 टक्के वाढीसह 184.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 22 मे 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 2.10 टक्के वाढीसह 187.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )

YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 207.55 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स मागील वर्षी 29 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO शेअरची किंमत 32 रुपये निश्चित करण्यात आली होती. तर हा स्टॉक 60 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता.

आयआरईडीए कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 215 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 49.99 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 49,293,60 कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील दिग्गज ब्रोकरेज फर्मने आयआरईडीए स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

चॉईस इक्विटी ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉक पुढील काळात 203 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांच्या मते या स्टॉकने 170 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. आणि शेअर 190 रुपये किमतीवर रेझिस्टन्स देत आहे. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकची एका महिन्यासाठी ट्रेडिंग रेंज 165 रुपये ते 210 रुपये दरम्यान असेल.

तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किंमत पातळीच्या वर ट्रेड करत आहे. आयआरईडीए ही नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली व्यवसाय करणारी कंपनी आहे. या सरकारी मालकीच्या कंपनीने GIFT सिटी गुजरात येथे इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटरमध्ये एक उपकंपनी स्थापन केली आहे. नुकताच या कंपनीला भारत सरकारने नवरत्न दर्जा देखील बहाल केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 22 May 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(115)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x