15 January 2025 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

IREDA Share Price | PSU शेअर प्राईस 330 रुपयांचा उच्चांक गाठणार, स्टॉक BUY करा किंवा Hold करा

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए म्हणजेच इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एनर्जी या कंपनीचे शेअर्स शुक्रवारी ग्रीन झोनमध्ये ट्रेड करत होते. मात्र दिवसाअखेर हा स्टॉक रेड झोनमध्ये क्लोज झाला होता. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या विक्रमी उच्चांक किमतीपेक्षा 16 टक्के खाली आले आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एनर्जी कंपनी अंश )

15 जुलै रोजी या कंपनीच्या शेअर्सने 310 रुपये ही उच्चांक किंमत स्पर्श केली होती. तर शुक्रवार दिनांक 26 जुलै रोजी हा स्टॉक 1.23 टक्क्यांच्या घसरणीसह 258.00 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. इंट्रा-डे ट्रेडमध्ये आयआरईडीए स्टॉक 268-257.80 रुपये दरम्यान ट्रेड करत होता.

आयआरईडीए कंपनीचे शेअर्स मागील वर्षी 29 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 32 रुपये निश्चित केली होती. आता हा स्टॉक 250 रुपये किमतीच्या पार गेला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 330 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, गुंतवणूकदारांनी हा स्टॉक 250-260 रुपये दरम्यान खरेदी करावा. तसेच तज्ञांनी गुंतवणूकदारांना 240 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलने जून तिमाही निकालानंतर आयआरईडीए स्टॉकवर SELL रेटिंग जाहीर केली होती. ब्रोकरेज फर्मने या कंपनीचे शेअर्स 130 रुपये म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत 60 टक्के खाली येण्याचा अंदाज वर्तवला होता. जून 2024 च्या तिमाहीत आयआरईडीए कंपनीच्या व्यवस्थापन अंतर्गत असलेल्या मालमत्तेत म्हणजेच AUM मध्ये वार्षिक आधारावर 24 टक्के वाढ झाली आहे. या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 59.7 वर आला आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत नाही.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 27 July 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x