IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस जाहीर
IREDA Share Price | इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीचे शेअर्स 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर जबरदस्त तेजीत वाढत होते. 6 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरईडीए कंपनीच्या शेअरने 215 रुपये किंमत स्पर्श केली होती.
मात्र मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवरून 26 टक्के कमजोर झाले आहेत. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 159.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
आयआरईडीए या सरकारी कंपनीचा IPO 29 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 49.99 रुपये होती. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लीलाधरच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉक 185 रुपये प्राईसला स्पर्श करू शकतो. जर हा स्टॉक 154 रुपये किमतीच्या पार गेला तर अल्पावधीत शेअर 185 रुपयेवर जाईल. IREDA स्टॉकमध्ये 186 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. म्हणजेच हा स्टॉक मंदीच्या काळात 124 रुपये किमतीवर घसरू शकतो.
डिसेंबर 2023 तिमाहीत आयआरईडीए कंपनीच्या निव्वळ नफ्यात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 67 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने 335.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आयआरईडीए कंपनीच्या लोनबुकमध्ये वाढ झाली आहे.
मात्र कंपनीचा निव्वळ NPA 2.03 टक्केवरून कमी होऊन 1.52 टक्क्यांवर आला आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या महसूल संकलनात मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 44.21 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीने 1,253.20 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत आयआरईडीए कंपनीने 868.98 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
आयआरईडीए कंपनीचा IPO 30-32 रुपये किमीवर लाँच करण्यात आला होता. एका लॉटमध्ये कंपनीने 460 शेअर्स ठेवले होते. या कंपनीचा IPO 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE या दोन्ही निर्देशांकावर ट्रेड करत आहेत. या कंपनीचा IPO स्टॉक 56.25 टक्के प्रीमियम वाढीसह सूचीबद्ध झाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | IREDA Share Price today NSE Live 24 February 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- PPF Investment Formula | PPF मध्ये फक्त पैसे गुंतवू नका, या फॉर्म्युल्याने PPF बचत करा, मिळेल करोडमध्ये परतावा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON