21 January 2025 6:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN SIP Investment | पगारदारांनो, SIP गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का, 5 कोटी रुपये परतावा मिळेल IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA
x

IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA

IREDA Share Price

IREDA Share Price | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी सकाळच्या ओपनिंगनंतर स्टॉक मार्केटमध्ये जोरदार घसरण दिसून आली होती. या घसरणीचा परिणाम काही शेअर्सवर दिसून आला. पीएसयू इरेडा कंपनी शेअर सुद्धा मंगळवारी घसरला होता.

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी शेअर मंगळवारी 1.49 टक्क्यांच्या घसरणीसह 204.80 रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. इरेडा कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 54,992 कोटी रुपये आहे.

गेल्या सहा महिन्यांत इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी शेअर २५ टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, गेल्या १ वर्षात या शेअरने 33.03 टक्के परतावा दिला आहे. आयपीओ सूचिबद्ध झाल्यापासून इरेडा शेअरने 226.60 टक्के परतावा दिला आहे. मात्र इरेडा शेअर त्याच्या 310 रुपये या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून 204.94 रुपये पर्यंत घसरला आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीत निधी उभारणीसंदर्भात मोठा निर्णय घेणार

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी कंपनी आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत निधी उभारणीसंदर्भात मोठा निर्णय घेणार आहे. निधी उभारणीच्या प्रस्तावावर विचार करून त्याला मंजुरी देण्यासाठी इरेडा कंपनीने २३ जानेवारीला संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. इरेडा’ कंपनीने फाइलिंगद्वारे स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे.

स्टॉक चार्ट संकेत – इरेडा शेअर रेंज-बाउंड झाला

स्टॉक चार्टवरील संकेतानुसार, इरेडा शेअरला वरच्या बाजूला मजबूत रेझिस्टन्स आहे आणि खालच्या पातळीवर सपोर्ट आहे. १९५ रुपयांच्या पातळीवर इरेडा शेअरला सपोर्ट आहे. या स्तरावर २००-दिवसांचा ईएमए देखील आहे. या पातळीवरून यापूर्वी शेअरने उसळी घेतली आहे, परंतु २१२ रुपयांच्या वरच्या पातळीवर इरेडा शेअरला रेझिस्टन्सचा सामना करावा लागत आहे. 50-दिवसांचा ईएमए या पातळीवर आहे, ज्यामुळे शेअरमध्ये तेजी येणं कठीण होतंय. अशा प्रकारे, इरेडा शेअर चार्ट चक्रात अडकला आहे, म्हणजेच इरेडा शेअर रेंज-बाउंड झाला आहे.

इरेडा शेअरमध्ये पुढे काय होऊ शकते

सध्या इरेडा शेअर घसरत असून त्याचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स ओव्हरसोल्ड झोनमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत देत आहे. सध्या आरएसआय रीडिंग ४७ आहे. इरेडा शेअर त्याच्या पुढील सपोर्ट पातळी म्हणजे 195 रुपये पर्यंत खाली जाऊ शकतो. कदाचित तेव्हाच त्याचा आरएसआय 35 च्या खाली जाईल आणि तो ओव्हरसोल्ड झोनमध्ये प्रवेश करेल असे चार्टवर संकेत दिसत आहेत.

इरेडा शेअरसाठी 195 रुपयांची पातळी महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे. शेअरने ही पातळी तोडल्यास पुढे तो १७० रुपयांच्या पातळीपर्यंत खाली घसरू शकतो. जोपर्यंत शेअर्समध्ये खरेदी वाढत नाही आणि किंमत २२० रुपयांच्या वर जात नाही तोपर्यंत नवीन खरेदीपासून दूर राहावे असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IREDA Share Price Tuesday 21 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x