21 November 2024 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News
x

IRFC Share Price | IRFC शेअरबाबत फायद्याचे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर २२९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून ३३ टक्क्यांनी (NSE: IRFC) घसरला आहे. 2023 आणि 2024 च्या सुरूवातीला IRFC शेअरने मोठा परतावा दिला होता. बुधवार 06 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.92 टक्के वाढून 154.35 रुपयांवर पोहोचला होता. (आयआरएफसी कंपनी अंश)

आयआरएफसीने २३० रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून घसरला आहे, परंतु शेअरला १३५ रुपये पातळीवर मजबूत सपोर्ट मिळाला आहे. त्यामुळे शेअर पुन्हा सकारात्मक तेजीत आहे. मात्र, शेअर 160 रुपयांचा रेझिस्टन्स झोन पार करण्यात यशस्वी झाल्यास पुढे अजून तेजी दिसू शकते असे संकेत सेंक्टम वेल्थ ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी दिले आहेत.

सेंक्टम वेल्थ ब्रोकरेज फर्म – शेअर टार्गेट प्राईस
पुढील तेजीच्या दृष्टिकोनातून IRFC शेअर 160 ते 164 रुपयांच्या पातळीवर टिकून राहणे आवश्यक आहे, जे शेअरच्या 50 आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीशी जुळते, असे सेंक्टम वेल्थ ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी सांगितले. IRFC शेअरने १६० रुपयांची पातळी ओलांडल्यास पुढे हा शेअर १७५ ते १८० रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो, असे सेंक्टम वेल्थ ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी सांगितले.

आयआरएफसी कंपनीने ४ नोव्हेंबरला दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यानुसार, IRFC कंपनीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ४.४ टक्क्यांनी वाढून १,६१२.६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहीत आयआरएफसी कंपनीचा ऑपरेटिंग नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४.४ टक्क्यांनी वाढून १,६१३.१ कोटी रुपये झाला आहे.

IRFC शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ महिन्यात आयआरएफसी शेअरने 6.93% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात शेअर 0.84% घसरला आहे. मागील १ वर्षात शेअरने 112.02% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर आयआरएफसी शेअरने 53.74% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price 06 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(106)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x