23 December 2024 1:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर EPF on Salary | पगार 15,000 आणि पगारातून कापला जातोय EPF, प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना इतकी महिना पेन्शन मिळणार Bank Cheque Double Line | चेकने पेमेंट करता? 99% लोकांना माहित नाही, त्या 2 क्रॉस रेषा म्हणजे 'अटी' असतात
x

IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, स्टॉक ब्रेकआउट देणार, BUY रेटिंग - NSE: IRFC

IRFC Share Price

IRFC Share Price | मागील काही दिवस स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने घसरण होतेय. या घसरणीत अनेक फायद्याचे शेअर्स स्वस्तात खरेदी करण्याची संधी प्राप्त (NSE: IRFC) झाली आहे. सप्टेंबर महिन्यात स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती. या घसरणीत अनेक शेअर्स 50 टक्क्यांपेक्षा अधिक घसरले आहेत. या कालावधीत स्टोक मार्केट निफ्टी 11 टक्क्यांनी घसरला आहे. (आयआरएफसी लिमिटेड कंपनी अंश)

एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग

दरम्यान, एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने आयआरएफसी लिमिटेड या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयआरएफसी लिमिटेड शेअर त्याच्या उच्चांकावरून 36 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, मागील काही सत्रांपासून आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअर पुन्हा मजबूत होताना दिसत आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस

एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी 174 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच आयआरएफसी शेअर 138 रुपयांना खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने आयआरएफसी शेअरसाठी 134.50 रुपये स्टॉप-लॉस ठेवावा असा सल्ला देखील दिला आहे. पुढील 3 महिन्यांत आयआरएफसी शेअर 174 रुपये टार्गेट प्राईस गाठेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

आयआरएफसी शेअरने ब्रेकआउट दिला

एचडीएफसी सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या मते, मागील काही सत्रांपासून आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. टेक्निकल चार्टचा विचार केल्यास दैनिक टाइमफ्रेमवर आयआरएफसी शेअरने ब्रेकआउट दिला आहे. दैनंदिन आणि साप्ताहिक टाइमफ्रेमवर तेजीचे संकेत आहेत. याशिवाय, आयआरएफसी शेअर पॉइंट आणि फिगर चार्टवर डबल टॉप बाय पॅटर्न तयार होत आहे, जो IRFC शेअरमध्ये तेजीचा संकेत आहे. आरएसआय सारख्या मोमेंटम इंडिकेटरनी त्यांची सरासरी ओलांडून तेजी दर्शवली आहे. येत्या काही दिवसात आयआरएफसी शेअरमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे.

शेअरने 471% परतावा दिला आहे

मागील 3 महिन्यांत हा शेअर 19% घसरला आहे. मागील 6 महिन्यांत शेअर 21.06 टक्क्यांनी घसरला आहे. मागील १ वर्षात शेअरने 84.32% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात शेअरने 471.17% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 41.09% परतावा दिला आहे. आयआरएफसी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 229.05 रुपये तर 52 आठवड्यांचा नीचांक 74.23 रुपये होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price 21 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x